NCP Saam TV
महाराष्ट्र

NCP: राष्ट्रवादीतील खदखद चव्हाट्यावर; दोन गटातील वाद आला समोर

आढावा बैठकीस सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते माजी आमदार बैठकीत आले व थेट कार्यकर्त्यांमध्ये बसले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड -

यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत खदखद आज पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे दिसून आली आहे. यवतमाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. आढावा बैठकीसाठी पक्ष निरीक्षक व राज्य उपाध्यक्ष संजय खोडके (Sanjay Khodke) हजर होते. दरम्यान त्यांच्या समोर गटबाजीचे प्रदर्शन झाले आहे.

जिल्हाध्यक्ष क्रांती कामारकर यांना पदावरून हटवा असे पोस्टर शहरात लागल्याने आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आढावा बैठकीस सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रवादीचे (NCP) स्थानिक नेते माजी आमदार संदीप बाजोरिया (Sandeep Bajoria) बैठकीत आले व थेट कार्यकर्त्यांमध्ये बसले तेव्हा जिल्हाध्यक्ष कामारकर त्यांचे जवळ आले व व्यासपीठावर चला म्हणून विनवणी करू लागले. काही वेळानंतर माजी आमदार संदिप बाजोरीया व्यासपीठावर गेले.

हे देखील पहा -

मात्र, कार्यक्रमात घोषणाबाजी सुरू झाल्यानंतर त्यावर हा प्रकार खपून घेतल्या जाणार नाही अशी तंबी खोडके यांनी कार्यकर्त्यांना दिली. एकंदरीत राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत दोन गटातील खदखद चव्हाट्यावर आल्याने खोडके यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: साई मंदिरात फोडली दहीहंडी

Mirchi Bhaji: पावसाळ्यात बनवा कुरकुरीत अन् खमंग मिरची भजी; सोपी रेसिपी वाचा

NCERT Partition Module : भारत-पाकिस्तान फाळणीचं नवं मॉड्यूल; काँग्रेस जबाबदार, नेहरूंच्या भाषणाचाही दाखला

गोविंदांनी उंच मनोऱ्यावर केला ‘छावा’चा सीन; मुख्यमंत्र्यांनी टाळ्या वाजवून दिली दाद |VIDEO

Peacock Feather Benefits: मोरपिस खिशात ठेवण्याचे फायदे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT