यवतमाळच्या कळंब नगरपंचायत निवडणुकीत २४ वर्षाच्या विजय चव्हाणने मारली बाजी! SaamTvNews
महाराष्ट्र

यवतमाळच्या कळंब नगरपंचायत निवडणुकीत २४ वर्षाच्या विजय चव्हाणने मारली बाजी!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- संजय राठोड

यवतमाळ : पारधी समाज म्हटलं की रानावनात भटकून शिकार करून उदर निर्वाह करणारा उपेक्षित समाज डोळ्यासमोर उभा राहतो. कुठं तरी बेड्यावर निर्वासित जीवन जगणाऱ्या या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रयत्न सुरू असतात. हल्ली या समाजात शैक्षणिक जनजागृती सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे.

हे देखील पहा :

मात्र, हा समाज राजकीय प्रवाहापासून कोसो दूरच आहे. मात्र, यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील कळंब (Kalamb) नगरपंचायत निवडणुकीत (Nagar Panchayat) प्रभाग क्रमांक ११ मधून पारधी समाजाचा विजय चव्हाण (वय २४ वर्षे) या युवकाने सर्व राजकीय प्रस्थापितांना मागे टाकत विजय मिळवला आहे. शिवसेनेकडून (Shivsena) विजय चव्हाण याला उमेदवारी देण्यात आली होती. निवडणूक आखाड्यात उतरल्यानंतर विरोधकांकडून या नवख्या उमेदवाराला पराभूत करण्याचे अनेक प्रयत्न झाले.

मात्र, विजय चव्हाण ने भाजपचे (BJP) सतीश मरापे आणि काँग्रेसचे (Congress) विष्णू उईके यांना चारही मुंड्या चीत करित विजय मिळवला. विजय चव्हाण यांना ३२१ मते पडली. तर, भाजपचे सतीश मरापेंना १७४ आणि काँग्रेसचे विष्णू उईकेंना १५९ मते मिळाली. दरम्यान, विजय चव्हाण या पारधी समाजाच्या युवकाने निवडणूकीत बाजी मारल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्याच्या विजयाची सर्वदूर चर्चा होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

PM Modi Speech: 'काँग्रेसने एससी, एसटी ओबीसींना जाणूनबुजून मागे ठेवलं', PM मोदींचा मोठा आरोप; मविआवरही जोरदार टीकास्त्र| पाहा VIDEO

IAS, IPS अधिकाऱ्यांचा पगार किती? कोण घेतं सर्वाधिक मानधन? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

MHADA Lottery 2024: घरं 2030, अर्ज तब्बल 134344; किंमती कमी झाल्यानंतर लोकांचा कल वाढला!

SCROLL FOR NEXT