शिकाऊ डॉक्टरची हत्या, महाविद्यालयातच आढळला मृतदेह Saam Tv
महाराष्ट्र

Yavatmal Crime: शिकाऊ डॉक्टरची हत्या, महाविद्यालयातच आढळला मृतदेह

हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

यवतमाळ - वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एका शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची हत्या करण्यात आली आहे. या डॉक्टरचे नाव अशोक पाल असे आहे. मध्यरात्रीच्या सुमारास वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात ही हत्या करण्यात आली आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

हे देखील पहा -

डॉ. अशोक पाल मागील काही दिवसांपासून यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करत होते. ही हत्या अज्ञात व्यक्तीने केली असून शिकाऊ डॉक्टरचा मृतदेह महाविद्यालयाच्या परिसरात आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेप्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरु केला आहे.

दरम्यान, हत्या प्रकरणानंतर रुग्णालय परिसरात परिविक्षाधीन डाॅक्टराकडून महाविद्यालय प्रशासन व डीनविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. रुग्णालयामध्ये परिविक्षाधीन डॉक्टरांनी ठिय्या मांडला. तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेवर प्रश्न विचारला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावमध्ये मोठा राडा! भाजप नेत्याला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update : मुलुंडमध्ये कारच्या इंजिनमध्ये आढळला 5-6 फूट लांबीचा साप

LPG Cylinder Booking: ऑनलाइन-ऑफलाइननेही सिलिंडर बुक होत नाही? नेमकं काय आहे कारण, जाणून घ्या

गॅस सिलिंडरसाठी जास्त पैसे घेतले तर खबरदार! थेट गुन्हा दाखल होणार

Kuldeep Yadav Wedding: कुलदीप यादवची होणारी बायको कोण? मेहेंदीचे फोटोचे झाले व्हायरल

SCROLL FOR NEXT