money, yavatmal crime news saam tv
महाराष्ट्र

Yavatmal Crime News : मुलीच्या शिक्षणासाठीचे नव्वद हजार रुपये चाेरीस, कुटुंबास बसला धक्का

हा प्रकार येथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

Siddharth Latkar

- संजय राठोड

Yavatmal News : मुलीचे शिक्षण व बियाण्यांसाठी बँकेतून काढलेल्या ९० हजारांच्या रकमेवर चोरट्याने डल्ला मारला. ही घटना यवतमाळच्या (yavatmal) पुसद (pusad) तालुक्यातील शेंबाळपिंपरी (shembalpimpri) येथे घडली. (Maharashtra News)

या घटनेनंतर पाेलिसांत तक्रार करण्यात आली. पाेलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरातील चित्रण तपासले. आता (yavatmal) खंडाळा पोलिसांसमोर चोरट्यास पकडण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे नागरिक धास्तावले आहेत.

या घटनेबाबत पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार शिवूर (ता. हदगाव) येथील सुभाष देशमुख यांनी येथील स्टेट बँकेतून मुलीच्या शिक्षणासाठी व बी-बियाण्यांसाठी ९० हजार रुपये काढले.

ते पैसे घेऊन देशमुख एका ओळखीच्या दुकानावर येऊन बसले होते. तेथे उपस्थित असलेल्या एका अनोळखी युवकाने मोठ्या शिताफीने पिशवीतील ९० हजार रुपये अलगद काढून घेत तेथून पोबारा केला.

हा प्रकार येथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेचा तपास खंडाळा पोलिस करीत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संसद परिसरात विरोधकांची निदर्शनं

वारंवार होणाऱ्या पोटदुखीकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, असू शकतात किडनी फेल होण्याची लक्षणे

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढलाय की नाही? अवघ्या ३०० रुपयांची 'ही' टेस्ट वाचवेल तुमचा जीव?

अभिजीत दीपके नेमकं आहेत कुठे? आंदोलन संपले तरीही घरी परतले नाहीत, सुरक्षा पुरवा; राज्यातील मंत्र्याची मागणी

Mobile : सकाळी उठल्या उठल्या सर्वात आधी आपण मोबाईल फोन का पाहतो? कारण वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT