Om Butle a young man was fatally attacked Saam Tv News
महाराष्ट्र

Yavatmal Crime : दुर्गादेवी विसर्जनावेळी संपवलं, जुन्या भांडणाचा राग डोक्यात; बायकोसोबत जाताना तरुणाला गाठलं, अन्...

Yavatmal Om Butle Attack : यवतमाळमधील आर्णी इथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुर्गादेवी विसर्जनाच्या वेळी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी दोघांनी ओम बुटले नावाच्या तरुणावर जीवघेणा हल्ला केलाय.

Prashant Patil

संजय राठोड, साम टीव्ही

यवतमाळ : यवतमाळच्या आर्णी इथे एका धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली असून उद्या वाढदिवस असलेल्या ओम बुटलेवर तिघांनी तलवार आणि चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे. ओम बुटले (वय २३, रा. आर्णी) असं हल्ल्यातील गंभीर जखमी असलेल्या तरुणाचं नाव आहे. सध्या त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे. दुर्गादेवी विसर्जनाच्या वेळी झालेल्या भांडणातून कोळवण येथील अजय तिघलवाड याचा ओम बुटले आणि दत्ता वानखडे यांनी खून केला होता.

१५ दिवसांपूर्वीच ओम बुटले जामिनावर बाहेर आला होता. पुण्याला बायकोला काही कामासाठी घेऊन जात असताना अवधूत तिघलवाड आणि अन्य दोघांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ओम बुटले हा गंभीर जखमी झाला आहे. अवधूत तिघलवाड पोलिसांच्या ताब्यात असून आर्णीत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ओम बुटलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत अजय तिघलवाड याच्या वडिलांचा देखील या हल्ल्यात हस्तक्षेप असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, जुन्या वादातून हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT