यवतमाळ जिल्ह्यात 31 जुलै 2026 रोजी शाळा-महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी.
सततचा मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाचा निर्णय.
प्राथमिक, माध्यमिक शाळांसह महाविद्यालयांनाही सुट्टी लागू.
यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्वा शाळांबाबत मोठा निर्णय घेतलाय. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विकास मीना यांनी शुक्रवार, ३१ जुलैला जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. हा आदेश सर्व शासकीय, अनुदानित व खासगी शैक्षणिक संस्थांना लागू करण्यात आलाय.
हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्यासाठी अतिवृष्टीसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. संभाव्य पूरस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही जीवितहानी किंवा अनुचित घटना घडू नये, यासाठी सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे,पाण्याने भरलेले रस्ते किंवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्रातही वेगवेगळ्या भागात पाऊस परतलाय. पुढील काही दिवस पासवाच्या सरी अशाच बरसणार आहेत. हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी नवीन आवाहन करण्यात आले आहे.
या काळात पावसाची शक्यता लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. IMD च्या अंदाजानुसार 30 ते 31 जुलै या काळात मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होऊ शकतो. 30 ते 31 जुलै या काळात मराठवाड्यातही सरी बरसू शकतात. विदर्भातही या काळात पाऊस कोसळू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.