Yashomati Thakur saam tv
महाराष्ट्र

क्वालिटीचं काम नाही झालं तर डोकं फोडेन; यशोमती ठाकूरांनी अधिका-याला दिला दम (व्हिडिओ पाहा)

राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर या विकास काम करताना त्याचा दर्जा उत्तम असावा यासाठी आग्रही आणि आक्रमक राहिल्याचे दिसून आलं.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

अमरावती : इथं क्वालिटीचं काम नाही झालं तर डोकं फोडेन लक्षात ठेवा असा दम आज (साेमवार) अमरावती (amravati) जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री काॅंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकुर (yashomati thakur) यांनी पीडब्लूडीच्या अधिका-यांना दिला. त्याबाबतचा व्हिडिओ साेशल मिडियात (Social Media) व्हायरल झाला आहे. (Yashomati Thakur News)

तिवसा (tiwasa) तालुक्यात अमरावतीच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते एका ठिकाणी रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन झाले. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक, ठाकूर यांचे कार्यकर्ते तसेच शासकीय अधिकारी उपस्थित हाेते. (Yashomati Thakur Latest Marathi News)

या रस्त्याच्या भूमिपूजनानंतर माजी मंत्री यशाेमती ठाकूर यांनी हे काम उत्तम दर्जाचं झालं पाहिजे अशी भुमिका मांडली. ही भुमिका मांडता ठाकूर यांनी हे काम करीत असताना काेणा काेणावर जबाबदारी आहे असं उपस्थित अधिका-यांना विचारले. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपस्थित अधिका-यांनी आम्ही आहाेत असं नमूद केले. त्यावर ठाकूर यांनी मी तुमच्याकडून एक रुपयाही घेत नाही, इथं क्वालिटीचं काम दिसलं नाही तर डाेकं फाेडेन लक्षात ठेवा असा इशारा दिला. त्यावेळी उपस्थित अधिका-यांनी हाे मॅडम... हाे मॅडम असे म्हणत मान डाेलावली. (Yashomati Thakur Viral Video)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: फक्त ३ दिवसांत स्किन होईल सॉफ्ट आणि ग्लोईंग; आजच ट्राय करा 'हा' घरगुती फेसपॅक

तुम्हीही प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय? तर आत्ताच व्हा सावध! शरीरावर होऊ शकतात ५ गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update : घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७ वर पोहचला

आमदार विकून मुख्यमंत्रिपद दिलं अन् त्याला लोकशाही म्हणता?; कपिल सिब्बल भडकले,आयोगाची कोंडी, युक्तिवादाचा शब्द ना शब्द

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन! शाळांना सुट्टी जाहीर, कार्यक्रम रद्द; राजकारणात शोककळा

SCROLL FOR NEXT