Yashomati Thakur Criticize Budget 2022  Saam Tv
महाराष्ट्र

Budget 2022 Reactions: "सामान्य माणसाचं शोषण करून सरकार श्रीमंत होत चाललंय" - यशोमती ठाकुर

Union Budget 2022: सामान्य माणसाचं शोषण करून सरकार श्रीमंत होत चाललंय. ८४ टक्के भारतीयांचं उत्पन्न घटलेलं असताना सरकारच्या उत्पन्नात ६४.९ टक्क्यांची विक्रमी वाढ झालीय. अतिशय गंभीर परिस्थिती आहे असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत वार्षिक अर्थसंकल्प २०२२-२३ (Union Budget 2022) मांडला. यावेळी त्यांनी भारतात डिजिटल करन्सीसह (Digital Currency) अनेक नव्या घोषणा केल्या. यंदाच्या अर्थसंकल्पात आयकरात (Income Tax) कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नसल्याने सर्वसामान्यांची निराशा झाली आहे. सलग सहाव्या वर्षी कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्हर्च्यूअल करन्सीतून होणाऱ्या कमाईवर ३० टक्के कर लावण्यात आला आहे. मात्र या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांच्या आणि पगारदारांच्या तोंडाला सरकारने पानं पुसली असा आरोप राज्याच्या महिला आणि बालकल्याणमंत्री यशोमती ठाकुर (Yashomati Thakur) यांनी केला आहे. (yashomati thakur criticize the government regarding the union budget 2022)

हे देखील पहा -

यशोमती ठाकुर यांनी सरकारच्या वाढलेल्या आणि जनतेच्या घटलेल्या उत्पन्नाबाबत सरकारवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, सामान्य माणसाचं शोषण करून सरकार श्रीमंत होत चाललंय. ८४ टक्के भारतीयांचं उत्पन्न घटलेलं असताना सरकारच्या उत्पन्नात ६४.९ टक्क्यांची विक्रमी वाढ झालीय. अतिशय गंभीर परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे "पगारदार आणि मध्यमवर्गाच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प. कोविड काळात संकटात सापडलेल्या मध्यमवर्गासाठी आयकरात कुठलाच बदल किंवा सवलत नाही. हे सरकार संवेदनशील नाही. सामान्य माणसांचा आवाज ऐकायचा नाहीच असंच सरकारने ठरवलेले दिसतेय." अशा शब्दांत त्यांनी अर्थसंकल्पावर टीका आहे.

क्रिप्टोकरन्सीबाबतही (Cryptocurrency) त्यांनी सरकराला धारेवर धरलं आहे. "क्रिप्टोकरन्सी बाबत स्पष्ट धोरण नसलेल्या सरकारने शेवटी ब्लॉकचैन तंत्रज्ञानावर आधारित डिजीटल रूपी आणण्याची घोषणा केली आहे, क्रिप्टोकरन्सी भारतात अधिकृत करण्यात आलीय का,याबाबतचं बिल न आणताच मागच्या दाराने क्रिप्टोकरन्सीला मंजूरी दिलीय का? याबाबत इतका गोंधळ बरा नाही" असं त्या म्हणाल्या आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT