आमच्या मुलीवर चुकीची कारवाई; डॉ.विशाखा शिंदेंच्या आईवडिलांचा आरोप! गोविंद साळुंके
महाराष्ट्र

आमच्या मुलीवर चुकीची कारवाई; डॉ.विशाखा शिंदेंच्या आईवडिलांचा आरोप!

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात 6 नोव्हेंबर ला कोविड ICU विभागाला लागलेल्या आगीत 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेत कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत सहा जणांवर कारवाई करण्यात आली.

गोविंद साळुंके, साम टीव्ही, शिर्डी

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयात 6 नोव्हेंबर ला कोविड ICU विभागाला लागलेल्या आगीत 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेत कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत सहा जणांवर कारवाई करण्यात आली. त्यात राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील डॉ.विशाखा शिंदे या शिकाऊ डॉक्टरचा देखील समावेश आहे. या घटनेतील 4 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक देखील केलीय. 2 दिवसांच्या पोलीस कोठडी नंतर हे 4 जण आता न्यायालयीन कोठडीत आहेत. या अटकेच्या विरोधात जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे.

त्यातच डॉ.विशाखा शिंदे या शिकाऊ डॉक्टर असल्याने त्यांचे निलंबन मागे घेतले असले तरी त्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे सध्या या लोकांचा या घटनेत काय दोष असा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला जातोय. बेरियाट्रिक सर्जन डॉ.जयश्री तोडकर यांनी देखील ट्विट मध्ये अटक करण्यात आलेल्या डॉ.विशाखा शिंदे यांच्यावर भाष्य केले आहे. डॉ.जयश्री तोडकर यांनी केलेली पोस्ट समाज माध्यमाच्या मधून प्रचंड व्हायरल होत आहे आणि त्यामुळे शिकाऊ डॉक्टर वरील कारवाई हा चर्चेचा विषय ठरत आहेत.

डॉ.विशाखा शिंदे ही माझी मुलगी असून ही रुग्णालयात शिकाऊ डॉ.म्हणून काम करत आहे. तरी पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता तिच्यावर गुन्हा दाखल करून वैद्यकीय अधिकारी म्हणून सांगण्यात आलं आणि तिला निलंबित करण्यात आले असून हि कारवाई चुकीची आहे. आता निलंबन मागे घेतले पण न्यायालयीन कोठडी कायम आहे. ज्या जबाबदार व्यक्ती होत्या त्यांच्यावर कारवाई न करता शिकाऊ विद्यार्थिनीवर कारवाई केल्याने माझ्या मुलीचं भविष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचे शिंदे यांच्या आईवडिलांनी म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

SCROLL FOR NEXT