Writer, Poet Sangita Barve saam Tv
महाराष्ट्र

बाल साहित्य पुरस्कार २०२२ : संगीता बर्वे यांना ‘पियूची वही’ कादंबरीसाठी पुरस्कार

साहित्य अकादमीने आज वर्ष २०२२ च्या बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा केली.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : प्रसिद्ध लेखिका संगीता बर्वे (Sangita Barve) यांना ‘पियूची वही’ या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा ‘साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार’ आज जाहीर झाला आहे. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने आज वर्ष २०२२ च्या बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा केली.अकादमीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर कंबार (Chandrashekhara Kambara) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील २२ प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कारांची निवड व घोषणा करण्यात आली.

संगीता बर्वे यांचे लेखनकार्य

व्यवसायाने डॉक्टर असलेल्या संगीता बर्वे या उत्तम कवयित्री आणि बाललेखिका आहेत.‘मृगतृष्णा’ आणि ‘दिवसाच्या वाटेवरून’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिध्द आहेत.बर्वे यांची बाल लेखिका म्हणूनही वेगळी ओळख आहे.‘गंमत झाली भारी’,‘झाडआजोबा’,‘खारुताई आणि सावली’,‘उजेडाचा गाव’ हे त्यांचे मुलांसाठीचे कवितासंग्रह असून ‘पियूची वही’ ही कांदबरी विशेष प्रसिध्द आहे.याच कादंबरीवर आधारित ‘संगीत पियूची वही’ (piyuchi wahi) हे बाल नाटयही त्यांनी लिहीले आहे.‘अदितीची साहसी सफर’ या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला आहे. यासोबतच,त्यांनी विविध विषयांवर ललित लेखनही केले आहे. बर्वे यांच्या कवितासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचा कविवर्य भा.रा.तांबे पुरस्कार,इंदिरा संत योजनेंतर्गत उत्कृष्ट वाचन निर्मिती पुरस्कार, विशाखा पुरस्कार, कामगार साहित्य परिषदेचा ग.दि.माडगूळकर पुरस्कार ,अनन्वय पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

'पियूची वही’ काय आहे?

रोजनिशी लिहीण्यासाठी रोज काहीतरी लिहिण्यासारखे केले पाहिजे, या प्रेरणेतून पीयू नावाच्या मुलीला निसर्गातील वेगवेगळया गोष्टींची होणारी ओळख हे ‘पियूची वही’या कादंबरीचा विषय आहे. पीयू नावाची एक छोटी मुलगी रोजनिशी लिहिण्यासाठी काहीतरी केले पाहिजे,म्हणून सुटीच्या दिवशी खिडकी रंगवायला घेते. त्यातून तिला तिचे जग आणि निसर्ग सापडतो.निसर्ग आणि निसर्गातील विविध घटकांच्या ओढीने पीयू आपले अनुभव लिहू लागली.

परिक्षक मंडळ आणि पारितोषिक

भारत सासणे,प्रवीण बानदेकर आणि प्रेमानंद गजवी या साहित्यिकांचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार निवडीच्या परिक्षक मंडळात समावेश होता.५० हजार रुपये आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून यावर्षी १४ नोव्हेंबर २०२२ या बालदिनी साहित्य अकादमीच्या विशेष कार्यक्रमात या पुस्काराचे वितरण करण्यात येईल. या पुरस्कारांमध्ये कोकणी भाषेसाठी लेखिका ज्योती कुंकळकर यांच्या ‘मयुरी’ या कादंबरीस बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

SCROLL FOR NEXT