Sangli crime news Saam Tv News
महाराष्ट्र

Sangli crime news: आधी कारच्या काचा फोडल्या, नंतर तलवारीने सपासप वार; पैलवानाच्या हत्येने सांगलीत खळबळ

Wrestler killed in Sangli: जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका पैलवानाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना सांगलीत घडली असून, तलावारीने वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.

Bhagyashree Kamble

विजय पाटील, साम टीव्ही

जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका पैलवानाची निर्घृण हत्या करण्यात आलीय. ही धक्कादायक घटना सांगलीच्या खानापूर तालुक्यातील, कार्वे येथील विटा - तासगांव रस्त्यावरील पुलावर घडलीय. बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्याच्यावर तलवारीने वार करून हत्या केल्याची माहिती आहे. राहूल गणपती जाधव (वय वर्ष ३५) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या हत्येनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी मृत राहूल यांचे भाऊ राजाराम जाधव यांनी विटा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या हत्या प्रकरणात माणिक संभाजी परीट, गजानान गोपीनाथ शिंदे, अमृत शहाजी माळी, नयन रंगलाल धाबी, प्रफुल्ल कांबळे, रोहन रघुनाथ जाधव आणि नितीन पांडुरंग जाधव अशी संशयितांची नावे आहेत. तर, माणिक परीट, गजानन शिंदे आणि नयन धाबी या तीन संशयितांना ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितले.

राहुल जाधव आणि संशयित आरोपी यांच्यात जुन्या भांडणावरून खटके उडाले होते. याच गोष्टीचा राग मनामध्ये धरून संशयितांनी इतरांना बोलावून घेतलं. नंतर राहुल जाधव याच्या चारचाकीच्या काचा फोडल्या. राहूल याला बाहेर ओढून घेत, संशयित हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवार आणि हॉकी स्टिकने डोक्यात आणि अंगावर सपासप वार केले. काही क्षणातच राहूल याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत तपासाला सुरूवात केलीय.

घडलेल्या घटनेनंतर, उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील, पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला. तसेच संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी हल्लेखोरांचा शोध सुरू असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही. जे. येळेकर करीत आहेत. या प्रकरणानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT