worst work on mumbai goa highway says mp sunil tatkare saam tv
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway: सुनील तटकरे संतापले, आमचा अंत पाहू नका! मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरच अधिका-यांना झापलं

संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना खासदार सुनील तटकरेंनी सुनावले.

Siddharth Latkar

- सचिन कदम

MP Sunil Tatkare News :

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर (mumbai goa highway) सुरु असलेल्या कामाची पाहणी केल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी ठेकेदारासह अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. आज (साेमवार) रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (mp sunil tatkare) यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पहाणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Maharashtra News)

मुंबई गाेवा महामार्गावरील वडखळ ते लोणेरे या महत्वाच्या टप्प्याची पाहणी खासदार सुनील तटकरे यांनी केली. येथील कामाचा वेग आणि सद्य परिस्थिती यावर तटकरे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.

पावसाळ्यानंतर रस्त्यांची झालेली दुरावस्था रखडलेले काम याबाबत खासदार तटकरेंनी ठेकेदाराला सुनावले. तसेच अधिका-यांच्या कामाबाबत देखील नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले या भागातील काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक कामाचे अपडेट दररोज व्हाॅट्सअप द्वारे देण्याची ग्वाही ठेकेदार व अधिका-यांनी दिल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT