workers demands to start jawahar sutgirni dhule  Saam Digital
महाराष्ट्र

Dhule: जवाहर सुतगिरणी कधी सुरु हाेणार? आमदार कुणाल पाटलांना बेराेजगारांचा सवाल

workers demands to start jawahar sutgirni dhule: बेरोजगार कामगारांनी जवाहर सूतगिरणी सुरू करण्यासाठी आक्रमक पवित्रा हाती घेतला. सूतगिरणीच्या प्रवेशद्वारा बाहेर आंदोलकांनी घोषणाबाजी केली.

भूषण अहिरे

जवाहर सुतगिरणी तात्काळ सुरु करुन बेरोजगारांच्या हाताला काम द्या अशी मागणी करीत आज (साेमवार) बेरोजगार नागरिकांनी जवाहर सुतगिरणीच्या मुख्य प्रवेशद्वार येथे आंदाेलन छेडले. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सूतगिरणी बंद असल्याने कामगारांच्या राेजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याचे आंदाेलकांनी नमूद केले.

आज बेरोजगार कामगारांनी सूतगिरणी बाहेर आंदोलन करून सूतगिरणी लवकरात लवकर सुरू करावी, आम्हाला रोजगार उपलब्ध हाेईल अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांना निवेदनाच्या माध्यमातून केली.

आमदार कुणाल पाटील यांनी याबाबत सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा. दरम्यान याेग्य निर्णय न झाल्यास पुढील तीन ते चार दिवसात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा बेरोजगार कामगारांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT