Nandurbar: The work of the memorial of the martyred tribal brothers should be completed soon - the demand of the citizens दिनू गावित
महाराष्ट्र

Nandurbar: शहीद आदिवासी बांधवांच्या रखडलेल्या स्मारकाचं काम लवकर पूर्ण करावं - नागरिकांची मागणी

Nandurbar: रावलापाणी इंग्रज सैनिकांच्या बेछूट गोळीबारात शहीद झालेल्यांना आदिवासी बांधवांकडून सामूहिक श्रद्धांजली अर्पण; स्मारकाचं काम लवकर पुर्ण करण्याची नागरिकांची मागणी...

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार: भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईत इंग्रज सैनिकांच्या अमानुष गोळीबाराची साक्ष म्हणून रावलापाणी (Rawalapani) येथील निझरा नदीपात्रातील दगडावर असलेल्या गोळीबाराच्या (Firing) खुणा येथील समाज बांधवांनी आजही जतन करून ठेवल्या आहेत. शहीद वीरांची आठवण चिरस्मरणात राहावी व समाजातील तरुणांसाठी एक प्रेरणास्थान निर्माण व्हावे म्हणून एक भव्य स्मारक (Monument) होणे गरजेचे आहे. स्मारकासाठी 2018 साली पर्यटन विभागाच्यावतीने कामाला सुरुवात झाली खरी परंतु पायाभरणीनंतर काम ठप्प झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रावलापाणी येथील शहीद यांच्या स्मृती स्थळाची निर्मिती शासनाने दखल घेऊन पूर्ण करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (The work of the memorial of the martyred tribal brothers should be completed soon - the demand of the citizens)

हे देखील पहा -

रावलापाणी येथील या घटनेला आता 80 वर्ष पूर्ण होत आहे. येथील वातावरणात देशप्रेम, स्वातंत्र्याबद्दलची ओढ, भक्ती आणि त्याच सोबत निडरता आजही ठासून भरल्याचे जाणवते. शहिद बांधवांची आठवण म्हणून रावलापाणी येथे दर वर्षी २ मार्चला आदिवासी (Adivasi) बांधवांकडून सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम होतो. यावर्षी मोठ्या उत्साहात सामुहिक पद्धतीने शहिदांना श्रद्धांजली (Tribute) अर्पण करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT