Aurangabad News Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad: गर्भपातासाठी महिलांचा जीवघेणा खेळ; डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता

गर्भपातासाठी हा जीवघेणा खेळ वाढतच चालल्यामुळे डॉक्टरांनीही चिंता व्यक्त केलीये.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - गर्भपाताच्या गोळ्या गुपचूप खात असल्यामुळे दररोज दोन तरी महिला अत्यावस्थेत सरकारी दवाखान्यात येत असल्याची धक्कादायक बाब औरंगाबादमध्ये समोर आलीय. गर्भपातासाठी हा जीवघेणा खेळ वाढतच चालल्यामुळे डॉक्टरांनीही चिंता व्यक्त केलीये. (Aurangabad News Today)

गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्या अवैधरित्या खरेदी करून गुपचूप गोळ्या खाण्याचे प्रकार वाढलेत. त्यात औरंगाबादच्या (Aurangabad) घाटी हॉस्पिटलमध्ये दररोज किमान दोन महिला अशा येत आहेत, ज्या गर्भपाताच्या गोळ्या खाऊन गंभीर रुग्ण होतायत. जीवावर बेतणारी ही परिस्थिती स्वतःहून ओढवून घेतल्याचं डॉक्टरांचं निरीक्षण आहे.

हे केवळ एका सरकारी दवाखान्यातली परिस्थिती आहे. मात्र खाजगी दवाखान्यात किती महिला उपचार घेत असतील याचा अंदाज बांधला तर गर्भपाताच्या गुपचूप गोळ्या खाण्याचे प्रकार किती वाढलेय, याचा विचारही करायला नको. डॉक्टरांचा (Doctor) सल्ला न घेता मिळेल तिथल्या मेडिकलमध्ये किंवा ऑनलाईन खरेदी करून या गोळ्या घेतल्याने अतिरक्तस्राव आणि अर्धवट गर्भपात झालेल्या दररोज सरासरी दोन महिला घाटीत येत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे.

कोणाच्या सल्ल्याने या गोळ्या घेतल्या, याचे उत्तरच बहुतांश महिला डॉक्टरांना देत नाहीत. गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध विक्रीचा 'उद्योग' जिल्ह्यात जोरात सुरू असल्याची परिस्थिती आहे. गर्भपाताच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गोळ्या घेऊन गर्भपाताचा प्रयत्न केला जात आहे.

औरंगाबादच्या घाटीत दररोज किमान एक ते दोन रुग्ण येतात. त्यात रक्तस्राव, अर्धवट गर्भपाताचा प्रकार झाल्यानंतर महिला घाटी रुग्णालय गाठत असल्याची परिस्थिती आहे. गोळ्या घेतल्यानंतर अति रक्तस्राव झाल्याने महिला रुग्णालयात येतात. महिलांना अधिक काळजीपूर्वक विचारल्यानंतर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्याचे त्या सांगतात; परंतु, गोळ्या कोणी दिल्या, हे सांगितले जात नाही. त्यामुळे गुपचूप गोळ्या घेऊन स्वतःचा जीव संकटात टाकण्याचं काम आता तरी बंद केलं पाहिजे असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Ticketing : खुशखबर! मुंबई लोकल ट्रेनचं तिकीट Whatsappवर, जाणून घ्या बुकींग स्टेप्स

Manoj Jarange Patil : फडणवीस मराठा नेत्यांना संपविण्याच्या तयारीत, भाजप आमदार- खासदारांचे फोन; मनोज जरांगे पाटील यांचा धक्कादायक दावा

Maharashtra Live News Update: सतीश भोसले उर्फ खोक्याला जामीन मंजूर

New Marathi Serial : 'स्टार प्रवाह'वर येतेय नवीकोरी मालिका; लोकप्रिय अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत, सिरीयलचे नाव काय?

Dadar Kabutarkhana Rada: जैन समाजाला हिंसक बनवण्याचे काम मोदी-शहांनी केलं, संजय राऊतांचा घणाघात

SCROLL FOR NEXT