मळणीयंत्रात केस अडकून उपटल्याने महिला गंभीर; जिंतूर तालुक्यातील दुर्घटना  SaamTvNews
महाराष्ट्र

मळणीयंत्रात केस अडकून उपटल्याने महिला गंभीर; जिंतूर तालुक्यातील दुर्घटना

डोक्यावरचे केस यंत्रात अडकून ते उपटले गेल्याने सदरील साठ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली.

राजेश काटकर

परभणी : मळणीयंत्रावर काम करत असलेल्या महिलेच्या डोक्यावरचे केस यंत्रात अडकून ते उपटले गेल्याने सदरील साठ वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी जिंतूर (Jintur) तालुक्यातील सांगळेवाडी (Sangalewadi) येथे घडली. सध्या ग्रामीण भागातील शेतीमध्ये गहू, ज्वारी, हरभरा व इतर रब्बी पिकांच्या काढणीची व खळ्यांची लगबग सुरु आहे.

हे देखील पाहा :

कामासाठी मजुरांचा वानवा असून मजुरीचेही दर वाढलेले असल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कुटूंबातील घरातील महिलांसह सर्वजण कामाला लागले आहेत. महिलांना तर घरातील कामे आटोपून शेतातील कामांना हातभार लावावा लागत आहे. त्यानुसार सांगळेवाडी येथील निलावंती सखाराम सांगळे (वय ६० वर्षे) ह्या घरच्या शेतातील मळणीयंत्रावर गहू काढत असताना अचानक त्यांच्या डोक्यावरील केस मळणीयंत्रात अडकून ते उपटले गेल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या.

नातेवाईकांनी तत्काळ जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, डोक्यावरील संपूर्ण केस उपटल्यामुळे रक्तस्त्राव होऊ लागला. तेव्हा रुग्णालयातील प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना परभणी येथे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

Maharashtra Flood: अतिवृष्टीग्रस्तांना आतापर्यंत 8 हजार कोटींची मदत, पुढच्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 11 हजार कोटी

Narayan Rane : ...म्हणून मी शिवसेना सोडली; भाजप खासदार नारायण राणेंनी सांगितलं कारण

Wednesday Horoscope : संकटातून यशस्वीपणे मार्ग काढाल; ५ राशींच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरू होणार

SCROLL FOR NEXT