Nashik Accident News
Nashik Accident News Saam TV
महाराष्ट्र

Nashik Accident News : यात्रेला निघालेल्या महिलेचा वाटेतच मृत्यू; देवदर्शनाआधीच भरधाव वाहनाची जोरदार धडक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nashik :

नाशिकमधून एक दु:खद घटना समोर आली आहे. अंदारसुल येथे मढी यात्रेसाठी जात असलेल्या एका महिलेला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झालाय. देवाच्या यात्रेला पोहचण्याआधीच वाटेत ही घटना घडल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अंजनाबाई पांडू राठोड असं मृत महिलेचं नाव आहे. त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय. अंदारसुल येथे काळा माथा अपघाताचा स्पॉट म्हणून ओळखला जातो. येथे वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी लागते.

अंजनाबाई मढी येथे यात्रेसाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत निघाल्या होत्या. येथे जात असताना लघुशंका करण्यासाठी त्यांचे वाहन थांबले होते. त्यावेळी रस्ता ओलांडताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनांची त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, अंजनाबाई थेट हवेत दूरवर फेकल्या गेल्या. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने प्रचंड रक्तस्राव झाला.

दुर्दैवाने या अपघातात जागीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातामुळे त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तींना मोठा धक्का बसला आहे. अपघातानंतर छत्रपती संभाजी नगर-नाशिक मार्गावर काहीवेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह येवला येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आला असून येवला तालुका पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: पंतप्रधान मोदी आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार, वारासणीमधून निवडणूक लढवणार

Ghatkopar Hording Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर; ४३ जणांवर उपचार सुरू, रात्रभर बचावकार्य

Rashi Bhavishya: 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराचे प्रेम मिळणार, तुमच्या राशीत काय?

Today Horoscope: कटकटी वाढतील, सावधगिरीने काम करा; 'या' चार राशीच्या लोकांचा आज धनयोग फळफळणार

Yamaha च्या या स्कूटरमध्ये मिळेल 21 लीटर अंडरसीट स्टोरेज, 49 Kmpl मायलेज; जाणून घ्या किंमत

SCROLL FOR NEXT