Sloth Bear Attack Saam TV
महाराष्ट्र

Sloth Bear Attack: भारतीय नारी सगळ्यात भारी! अस्वलाच्या दहाडेतून पती आणि भावाची केली सुटका

Ruchika Jadhav

Karnataka News: अस्वलाचं नाव ऐकलं की लगेचच काळजात धडकी भरते. अस्वलाच्या हल्ल्यात व्यक्ती फार क्वचीतच वाचतो. मात्र कर्नाटकात एक चकीत करणारी घटना घडली आहे. या घटनेत महिलेने धाडस दाखवल्यामुळे तिच्या पतीचे आणि भावाचे प्राण वाचलेत. सोशल मीडियावर या महिलेची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं ?

कर्नाटकातील हावेरी येथे ही घटना घडलीये. शेतात दोन व्यक्ती काम करत असताना अचानक तेथे तीन अस्वल (Bear) येतात. अस्वल या दोन्ही व्यक्तींवर हल्ला करतात. तीन अस्वल या व्यक्तींच्या शरिराचे लचके तोडत असतात. दोघंही वाचवा वाचवा म्हणून जीवाच्या अकांताने ओरडतात. आपला पती आणि भाऊ संकाटात आहे. ओरडण्याचा हा आवाज त्यांचाच आहे हे तिच्या लक्षात येतं. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी महिला शेताच्या दिशेने धाव घेते.

महिलेने अस्वलासोबत केले दोन हात

शेतात (Farm) पोहचल्यावर 35 वर्षीय महिला आपल्या भावाला आणि पतीला पाहून पूरती भयभीत होते. दोघंही मृत्यूच्या दहाडेत असल्याचं पाहून ती थरथरु लागते. अशात पती आणि मुलगा या दोघांचाही जीव वाचवण्यासाठी ती आपल्या हातात कुऱ्हाड घेते. दबक्या पावलांनी ती अस्वलाजवळ पोहतचे आणि जोरात त्याच्यावर घाव करते.

अस्वलाने ठोकली धूम

महिलेने हल्ला करताच अस्वल देखील घाबरतो आणि तेथून पळ काढतो. त्यानंतर अन्य दोन अस्वलांवर महिलेचा भाऊ आणि पती हल्ला करतात. दोन्ही अस्वलांवर ते दगडाने हल्ला करतात. त्यामुळे उरलेले दोन्ही अस्वल देखील तेथून पळून जातात. अशा पद्धतीने महिलेला पती आणि भावाला वाचवण्यात यश आलं आहे. दोघेही जखमी असून त्यांच्यावर हुबळी येथील कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये उपचार सुरू आहेत.

शनिवारी बसवनकट्टी येथील रहिवासी बसीरसाब सावदत्ती (४५) आणि मुंडागोड गावातील रहिवासी रझाक नालाबंद (३०) अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. घटनेनंतर काही माध्यमांशी संवाद साधताना महिलेने म्हटलं आहे की, "पती आणि भावाला पाहून मी देखील घाबरले होते. मात्र नंतर त्यांचा जीव वाचवण्यासाठी माझ्यात अचानक अशी शक्ती आली. मी मनाचा पूर्ण विचार करत अस्वलावर कुऱ्हाडीने घाव घातला. काही वेळाने त्या अस्वलाचा मृत्यू झाला. माझा भाऊ आणि पती या दोघांचा जीव वाचल्यामुळे मी समाधानी आहे."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bachchu Kadu : 'मतदारसंघ शिवसेनेकडे; उमेदवार ठरवतो भाजप', बच्चू कडूंचा मोठा आरोप

Best Places In India:फिरण्याचा प्लान करताय? तर केरळ मधल्या या शहरांना द्या भेट

Dharashiv News : मागासवर्गीयांच्या एक लाखांहून अधिक नोकऱ्या चोरीला; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा आरोप

Vande Bharat Train Maharashtra: पुणे ते हुबळी, नागपूर ते सिकंदराबाद धावणार वंदे भारत; जाणून घ्या ट्रेनचा वेळ आणि तिकिटांचा दर

Maharashtra News Live Updates : मुंबई गोवा महामार्गावर कार आणि मोटरसायकलचा अपघात

SCROLL FOR NEXT