धक्कादायक! दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा नायलॉन मांजाने गळा कापला Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा नायलॉन मांजाने गळा कापला

औरंगाबाद शहरात दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेचा नायलॉन मांजाने गळा कापला

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेचा (woman) नायलॉन मांजाने (Nylon Manja) गळा कापला आहे. ही घटना शहरातील (city) गुलमंडी या भागामध्ये घडली आहे. बाजारात (market) खरेदी करून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वार महिलेचा पतंगाच्या नायलॉन मांज्याने गळा कापला गेल्याने औरंगाबाद (Aurangabad) शहरात पुन्हा नायलॉन मांजचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हे देखील पहा-

नायलॉन मांजामुळे शुभांगी वारद यांना खासगी रुग्णालयात (hospital) उपचार करण्यात येत आहे. औरंगाबाद शहरातील क्रांती चौकामध्ये राहणाऱ्या ४५ वर्षीय शुभांगी सुनील वारद या बुधवारी सायंकाळी गुलमंडीवर खरेदीसाठी जात होते. खरेदी झाल्यानंतर त्या दुचाकी घेऊन घरी निघाल्या असता गुलमंडी परिसरात त्यांच्यासमोर अचानक आलेला पतंगाचा (Kite) नायलॉन मांजा त्यांच्या गळ्यात अडकला.

कुणी तरी हा दोरा ओढल्यासारखे झाल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून दुचाकी थांबवून गळ्यात अडकलेला दोर पकडला. तोपर्यंत त्यांचा गळा चिरला गेल्याने झालेल्या जखमेतून रक्त निघू लागले. ही बाब त्यांनी त्याच्या पतीला कळवली. त्यानंतर त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: खुशखबर! १० दिवसात लाडक्या बहि‍णींच्या खात्यात जमा होणार ₹१५००, जानेवारीच्या हप्त्याबाबत अपडेट

Maharashtra Live News Update: पुण्यात महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक लांबणीवर

Diabetes Care: डायबेटीज झालाय? भात खाणं सोडू नका, डॉक्टरांनी सगळ्या शंका केल्या दूर... वाचा नेमकं काय सागितलं

Weight Loss Yoga Poses: वजन कमी करण्यासाठी कोणता योगा करावा? जाणून घ्या

Reduce sugar intake: तुमच्या आहारातून शुगर इंटेक कसा कमी कराल? पाहा सोपे मार्ग

SCROLL FOR NEXT