Sangli Crime News
Sangli Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Sangli: मुलं चोरीच्या अफवेमुळे भंगार गोळा करण्यासाठी आलेल्या महिलेला झाडाला बांधून मारहाण

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली: मुले पळवणारी महिला चोर समजून महिला ग्रामस्थांनी झाडाला बांधून भंगार गोळा करणाऱ्या एका महिलेला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार आज सांगलीच्या (Sangli) जत येथे घडला आहे.

या प्रकरणी जत पोलिसांनी (Police) चार महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जत तालुक्यात मुले चोरणारी टोळी आल्याचा मॅसेज सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. याच गैरसमजुतीतुन हा प्रकार घडला आहे.

मागील काही दिवसांपुर्वीच जत तालुक्यातील लवंगा येथे मुलं चोरणारी टोळी समजून साधूंना मारहाण केल्याच्या घटनेमुळे देशभरात खळबळ माजली होती. अशातच आता या घटनेमुळे लोक अशा अफवांना बळी का पडतायत हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पाहा व्हिडीओ -

मिळालेल्या माहितीनुसार, जतच्या ताड वस्ती जुने गोडावून येथे महिला लहान मुलांना घेऊन जात असताना मिळून आल्याने तिला पकडून ठेवलं आणि झाडाला बांधलं. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि महिला जमा झाल्या होत्या. यावेळी या महिलेला चार महिलांनी मारहाण केली.

घटनास्थळी जत पोलीस दाखल झाले आणि सदर महिलेला ताब्यात घेतलं. ही महिला जतच्या शेगाव येथील रहिवासी असल्याचे समजले आणि भंगार गोळा करण्यासाठी आल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी तिला तिच्या गावी पाठवलं आहे. तर मारहाण केलेल्या चार महिलांच्या विरोधात जत पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुले चोरणारी टोळी समजून साधू ना मारहाण करण्यात आली होती. जत मधील ही दुसरी घटना आहे. त्यामुळी पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर विश्वास ठेवू नये असे आव्हान केले आहे. तसे भासल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आव्हान केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poha Idli : सकाळी नाश्त्यात बनवा पोहा इडली; जाणून घ्या रेसिपी

Today's Marathi News Live : महायुतीचा पालघरमधील तिढा सुटला

Special Report : निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद, आयोगावर नेमका कुणाचा दबाव?

Rohit Pawar News | बारामती सहकारी बॅंकेतून 500च्या नोटा गायब, रोहित पवारांचा गंभीर आरोप

Pune Loksabha Election: "तुमच्या तात्याला साथ द्या" वसंत मोरेंची पुणेकरांना आर्थिक मदतची साद

SCROLL FOR NEXT