सीसीटीव्हीच्या मदतीने सराईत गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या... प्रदीप भणगे
महाराष्ट्र

सीसीटीव्हीच्या मदतीने सराईत गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या...

डोंबिवली पश्चिमेत 6 जुलैला घरफोडीची घटना घडली होती. बंद घराचे कडी कोयंडा तोडून घरातील 1 लाख 26 हजार रुपये किमतीचे सुमारे 4 तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने घेऊन हा चोरटा पसार झाला होता.

Krushnarav Sathe

डोंबिवली : सीसीटीव्हीच्या मदतीने घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात दोन महिन्यांनी विष्णुनगर पोलिसांना यश आले आहे. किसन व्हनकोरे (वय 25) असे आरोपीचे नाव असून नवी मुंबई परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे. 

हे देखील पहा -

डोंबिवली पश्चिमेत 6 जुलैला घरफोडीची घटना घडली होती. बंद घराचे कडी कोयंडा तोडून घरातील 1 लाख 26 हजार रुपये किमतीचे सुमारे 4 तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने घेऊन चोरटा पसार झाला होता.

सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या साहाय्याने विष्णुनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वडणे, पोलीस हवालदार आर.पाटणकर, एच.नलावडे, एस.नाईकरे, पोलीस नाईक बी.सांगळे यांच्या पथकाने माहिती घेत नवी मुंबईतील धाकटा खांदा परिसरात सापळा रचून अटक केली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मीठमुंबरी-बागवाडी जेटीवरील बोटिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Shraddha Dubey: मॉडेलिंगच्या नावाखाली काळा धंदा! ब्लॉगरच्या फ्लॅटवर छापा पडताच समोर आला धक्कादायक प्रकार

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

ज्ञानेश कुमारांना सोडणार नाही! सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार; राहुल गांधींचा सर्वात मोठा निर्णय

Mobile Use In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने होऊ शकतो मूळव्याध, आजपासून सोडा ती वाईट सवय

SCROLL FOR NEXT