Ravikant Tupkar, Raju Shetti, swabhimani shetkari sanghatana saam tv
महाराष्ट्र

Raju Shetti यांच्यावर अप्रत्यक्ष घणाघात...'लायकी नसलेल्यांनी आम्हांला शहाणपणा शिकवू नये'; 'स्वाभिमानी' वर रविकांत तुपकरांचा दावा? (पाहा व्हिडिओ)

Ravikant Tupkar vs Raju Shetti : बुधवारी स्वाभिमानी संघटनेची तातडीची बैठक झाली.

संजय जाधव

Buldhana News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी यांचे मागील काही काळापासून पटत नाही. त्यामुळे संघटनेतच नव्हे तर बाहेर देखील अशी चर्चा आहे की रविकांत तुपकर हे बंड करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आगामी काळात खरंच या संघटनेत ठिणगी पडणार की काय अशी शंका उपस्थित हाेऊ लागली आहे.(Maharashtra News)

बुलडाणा जिल्ह्यात नुकताच शेतकऱ्यांचा मोर्चा झाला. या माेर्चासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हे आले हाेते. परंतु या माेर्चात रविकांत तुपकर सहभागी झाले नाहीत. ते माेर्चाच्या ठिकाणी आले नाहीत. त्यामुळे तुपकर यांची नाराजी उघड झाली.

रविकांत तुपकर हे शेट्टींना भेटायला सुद्धा गेले नाहीत. त्यामुळे संघटनेत फूट पडते की काय असा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान बुधवारी स्वाभिमानी संघटनेची तातडीची जिल्ह्यातील पदाधिकारी यांची बैठक झाली.

या बैठकीत तर फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन वाघाची शिकार होत नाही असे म्हणत रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टींना (raju shetti) टोला लगावल्याची चर्चा आहे. यावेळी तुपकर यांनी संघटना कोणाची खाजगी मालमत्ता नाही, असे म्हणत संघटनेवर दावा केला की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना (swabhimani shetkari sanghatana) व पक्षाची बुलडाणा जिल्ह्यातील घाटावरील व घाटाखालील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक अत्यंत जोशपूर्ण वातावरणात पार पडली. स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर,बुलढाणा येथे झालेल्या बैठकीत विविध विषयांवर पदाधिकऱ्यांनी आपली मते दिलखुलासपणे मांडली. यावेळी संघटना व पक्षीय पातळीवर काही नियुक्त्या जिल्हा कार्यकारिणीच्या मान्यतेने करण्यात आल्या.

यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (घाटावरील) जिल्हाध्यक्ष पदी डॉ.ज्ञानेश्वर टाले व पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी बबनराव चेके व विद्यार्थी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी पवन देशमुख यांची फेरनिवड करण्यात आली. तर अल्पसंख्याक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी शेख जुल्फेकार यांची निवड करण्यात आली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (घाटाखालील) जिल्हाध्यक्ष पदी अमोल राऊत यांची निवड करण्यात आली व युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी अनंता मानकर व अल्पसंख्याक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी मासुम शहा यांची फेरनिवड करण्यात आली. तर पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी अनंदा अटोळे (खामगाव) यांची नियुक्ती करण्यात आली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदी श्याम अवथळे यांची निवड करण्यात आली. सर्व नवंनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमकपणे ताकदीने काम करण्याचा निर्णय या बैठकीत करण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT