satyajeet tambe
satyajeet tambe saam tv
महाराष्ट्र

Special Report : मामा आणि वडिलांप्रमाणे सत्यजित तांबे स्वतःला सिद्ध करणार?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन बनसोडे

Ahmednagar News : १९८५ साली मामा बाळासाहेब थोरात आणि २००९ साली वडील डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने टिकीट न दिल्याने दोघांनीही अपक्ष निवडणूक लढवली आणि घवघवीत यश मिळवत स्वतःला सिद्ध करून दाखवले. आता नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे हे देखील अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून कोणत्याही पक्षाने पाठिंबा दिला नाही तरी तांबे यांचेच पारडे जड असल्याचे संगमनेरातील राजकीय जाणकारांना वाटतंय.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे वडिल जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात हे काँग्रेसचे (Congress) निष्ठावान होते. मात्र १९८५ साली बाळासाहेब थोरात यांना काँग्रेस पक्षाने विधानसभेचे तिकीट नाकारल्याने त्यांनी काँग्रेस विरोधी भूमिका घेत अपक्ष निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते. त्यानंतरच्या काळात काँग्रेस पक्षाला त्यांची दखल घ्यावी लागली आणि आजवर थोरात हे काँग्रेसच्या तिकिटावर आठ वेळा निवडून आलेत.

असाच प्रसंग पुन्हा बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे सुधीर तांबे यांच्या बाबतीतही घडला. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने २००९ साली सुधीर तांबे यांनीही काँग्रेस विरोधी भूमिका घेत अपक्ष निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले.

काँग्रेसला त्यांचीही दखल घ्यावी लागली आणि त्यानंतरच्या नाशिक पदवीधर मतदार संघात दोन निवडणूका त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर लढल्या आणी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. वेळप्रसंगी पक्ष विरोधी भूमिका घेण्याची परंपरा संगमनेरात १९३७ सालापासून असल्याचे राजकीय विश्लेषक सांगताय.

आता पुन्हा तीच वेळ बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांच्यावर आलीये. गेल्या २२ वर्षांपासून युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या सत्यजित तांबेना पक्षांतर्गत राजकारणामुळे उपेक्षाच वाट्याला आलीये.

आपल्या मुलाच्या राजकिय भविष्यासाठी नाशिक पदवीधरचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी पुन्हा एकदा पक्षविरोधी भूमिका घेत सत्यजित तांबे याचा अपक्ष अर्ज दाखल केलाय. त्यांचा मतदारसंघात असलेला जनसंपर्क, मनमिळाऊ व्यक्तीमत्व आणि लाखों मतदारांची केलेली नोंदणी यामुळे कोणत्याही पक्षाच्या मदतीशिवाय मुलगा सत्यजित तांबे हा अपक्ष आमदार होवू शकतो असे देखील राजकीय विश्लेषकांना वाटतंय.

आपण जर नाशिक पदवीधर मतदारसंघात बलाबल बघीतलं तर सुधीर तांबे सर्वात सरस ठरताना दिसताहेत. मात्र अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेला मुलगा सत्यजित तांबे यांना आघाडी आणि भाजपनेही पाठींबा दिला नाही तर ते मामा आणि वडिलांप्रमाणे स्वतःला सिद्ध करतील का? हे बघणं महत्वाचं आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघ जिल्हानिहाय मतदार -

अहमदनगर - १ लाख १६ हजार ३१९ ....

नाशिक - ६६ हजार ७०९ ...

जळगाव - ३३ हजार ५४४ ...

धुळे - २२ हजार ५९३ ...

नंदूरबार - १९ हजार १८६ ...

एकुण मतदार- २ लाख ५८ हजार ३९१..

सुधीर तांबेनी केलेली मतदार नोंदणी - १ लाख ५० हजार ...

राजेंद्र विखेंनी केलेली मतदार नोंदणी - ४१ हजार ...

भाजपा - ३० हजार ...

शुभांगी पाटिल - १० हजार ...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flipkart Big Saving Days Sale च्या आधीच iPhone 14, iPhone 12 वर मिळत आहे मोठी सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर

Maharashtra Politics: महाराष्ट्रात सूडाचं राजकारण कशाला हवं? इथं कट्टर विरोधकही धरतात एकमेकांचे पाय

Raj Thackeray: राज ठाकरे महायुतीला का हवेत? महायुतीसाठी मनसे घेणार 'राज'सभा

Baba Ramdev: बाबा रामवेदांना मोठा दणका! पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदी

Gharat Ganpati : 'घरत गणपती' २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर

SCROLL FOR NEXT