vidhan parishad election, maharashtra, ravi rana saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Vidhan Parishad Election 2022 : आमदार रवी राणांचा शाेध सुरु

यंदाची निवडणुक चूरशीची हाेणार असल्याने याचा निकाल काय लागताे याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

अमरावती (ravi rana latest marathi news) : विधान परिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad election 2022) दहा जागांसाठी मतदानास आज (साेमवार) सकाळी प्रारंभ झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) भाई जगताप आणि भाजपच्या (bjp) प्रसाद लाड यांच्यात चूरशीची लढत मानली जात आहे. या निवडणुकीत आपल्या पक्षाचे प्राबल्य रहावे यासाठी नेते मंडळी प्रयत्न करीत आहेत. भाजपचे आमदार मुक्ता टिळक , आमदार लक्ष्मण जगताप हे पुण्यातील रुग्णालयातून मतदानासाठी मुंबईस रवाना झाले आहेत. दरम्यान आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर दाखल असलेल्या एका गुन्ह्यात अटक (arrest) वाॅरंट असल्याने ते सध्या अज्ञातवासात आहेत. त्यामुळे ते आजच्या मतदान प्रक्रियेस येणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Maharashtra Vidhan Parishad election 2022 News updates)

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याच्या वादावरून आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलिसांनी तेरा संशयित आरोपींना अटक केली हाेती. या प्रकरणात आमदार रवी राणा यांना सह आरोपी करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयातून त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. दरम्यान अमरावती पोलिसांनी हा अटकपूर्व जामीन रद्द करावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. त्यानंतर आमदार रवी राणा यांच्यावर वाॅरंट जारी करण्यात आले आहे.

आज विधान परिषद निवडणुक असल्याने आमदार रवी राणा हे मुंबईत येणार असे मानले जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर आहे. रवी राणा हे मुंबईच्या बाहेर आहेत असे समजत आहे. रवी राणा मुंबईत आले की त्यांना ताब्यात घेऊ शकतात म्हणून आमदार रवी राणा अज्ञातस्थळी असल्याची माहिती मिळत आहे.

रवी राणा हे मतदान केव्हा करणार ही वेळ मात्र त्यांच्याकडून मिळालेली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आमदार रवी राणा यांचे वकील नागपूरच्या हायकोर्टात वकिलांमार्फत वाॅरंट रद्द करण्यासाठी प्रयत्नशिल राहिले आहेत. राणांचे वॉरंट रद्द झाल्यास ते दुपारी मतदान करायला जातील असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! इतक्या रुपयांची फक्त एकदाच गुंतवणूक करा अन् दर महिन्याला मिळवा २०,००० रुपये

Maharashtra Live News Update: पुण्यात आज एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद

Success Story: MBBS केलं, नंतर पहिल्याच प्रयत्नात USPC क्रॅक; IPS अधिकाऱ्याची लेक झाली IAS; सौम्या झा यांचा प्रेरणादायी प्रवास

Mangal Gochar: काही तासांनंतर मंगळ करणार बुधाच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर होणार सकारात्मक प्रभाव

Tuesday Horoscope : नागदेवतेची कृपा होणार; अचानक धनयोग येणार; ५ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस ठरणार फलदायी

SCROLL FOR NEXT