पूरग्रस्तांना अधिकच्या मदतीसाठी सरकारवर दबाव आणू - फडणवीस  विजय पाटील
महाराष्ट्र

पूरग्रस्तांना अधिकच्या मदतीसाठी सरकारवर दबाव आणू - फडणवीस

सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी करण्यात येत आहे. पलूस तालुक्यातून फडणवीस यांनी पाहणी दौऱ्याला सुरुवात केली.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : 2019 च्या तुलनेत यंदा महापुरामुळे झालेले नुकसान अधिक असल्याने अधिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारवर दबाव आणून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी संघर्ष करू अशी भूमिका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. सांगलीच्या भिलवडी या ठिकाणी पुरग्रस्तांशी संवाद साधताना फडणवीस यांनी राज्य सरकारला हा इशारा दिला आहे.

हे देखील पहा -

सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी करण्यात येत आहे. पलूस तालुक्यातून फडणवीस यांनी पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. भिलवडी या ठिकाणी देखील देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करत येथील पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2019 च्या प्रमाणेच हा महापूर आहे. मात्र, यंदा नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. सर्व सामान्य नागरिकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांचे अतोनात नुकसान झालेले आहे. 2019 मध्ये आपल्या सरकारच्या माध्यमातून एनडीआरएफच्या निकषापलीकडे सर्व पातळ्यांवर पूरग्रस्तांना, शेतकरयांना मदत केली होती. या वेळीही अधिक नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर अधिक नुकसान भरपाई मिळायला हवी आणि त्या दृष्टीने मदत मिळण्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणण्यात येईल आणि पूरग्रस्तांना मदत मिळेपर्यंत आम्ही संघर्ष करू, असा इशाराही देवेंद्र फडणीस यांनी यावेळी सरकारला दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

मोठी बातमी! राज्यात तब्बल १.१४ लाख कोटींची गुंतवणूक; किती जणांच्या रोजगाराचा प्रश्न मिटणार?

SCROLL FOR NEXT