अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, प्रतिनिधी
Maharashtra politics : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन शाह घेणार आहेत. यानंतर ते दुपारी मालेगाव तालुक्यातील अजंग गावात सहकार परिषदेला उपस्थित राहणार आहे. या दौऱ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत नाशिक दौऱ्यावर जाणार आहे. त्र्यंबकेश्वर आणि मालेगाव येथेही ते अमित शाह यांना साथ देणार आहेत. ओझर विमानतळापासून अमित शाह यांच्या नाशिक दौऱ्याला सुरुवात होईल. या दौऱ्यात नाराज छगन भुजबळदेखील शाह यांची भेट घेणार आहे असे म्हटले जात आहे.
दरम्यान नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी पालकमंत्रिपदावर दावा केला आहे. पण अन्य घटक पक्षांमुळे तेथे वाद निर्माण झाला आहे. या एकूण प्रकरणावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या.
मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे नाराज आहेत अशा चर्चा सुरु होत्या. आता ते गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला जाणार आहेत. तेव्हा नाशिक दौऱ्यात अमित शाह आणि एकनाथ शिंदे एकत्र असल्याने रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.