Nana Patekar Saam Tv
महाराष्ट्र

Nana Patekar: नाना पाटेकर विधानसभेच्या रिंगणात उतरणार, खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवणार? स्वतःच दिलं उत्तर

Nana Patekar On Maharashtra Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीत नाना पाटेकर हे देखील निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे. याच चर्चांवर आता त्यानी स्वतः उत्तर दिलं आहे.

Satish Kengar

आगामी विधानसभा निवडणुकीची तारीख कधीही जाहीर होऊ शकते. यातच गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे की, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर विधानसभा निवडणूक लढू शकतात. ते खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याच चर्चांना आता पूर्णविराम देत नाना पाटेकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्या संदर्भात उत्तर दिलं आहे.

‘नाम’ फाउंडेशन संस्थेने आपल्या अनेक विधायक कामातून यशस्वी ९ वर्ष पूर्ण केली. १० व्या वर्षात पदार्पण करीत असताना या सर्व कामांचा आढावा घेत संस्थेचा १० वा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला. याच कार्यक्रमानंतर पत्रकारांनी नाना पाटेकर यांना प्रश्न विचारला की, तुम्ही खडकवासला विधानसभा मतदारसांघातून निवडणूक लढवणार का? इच्छुक आहात का? यावर उत्तर देताना नाना म्हणाले की, ''माझी अनेक राजकारण्यांशी मैत्री आहे. पण राजकारणात जाण्याचा माझा कोणताही विचार नाही. मी कुठूनही निवडणूक लढवणार नाही. मला निवडणुक लढवायची नाही.''

दरम्यान, नाम संस्थेचे विश्वस्त आणि सीएसआरच्या (CSR) माध्यमातून मदत करणाऱ्या प्रतिनिधींचा यावेळी कृतज्ञता पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.

सिर्फ 'नाम' ही काफी हे, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नाम’ फाउंडेशन संस्थेच्या कार्याचे कौतुक यावेळी केले. नेतृत्व सक्षम असेल तर समाजाच्या माध्यमातून परिवर्तन घडवता येते, हे ' नाम’ ने दाखवून दिल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. आपल्या ग्लॅमरचा योग्य तो उपयोग करून जनतेमध्ये विश्वास निर्माण करत लोकचळवळ उभारण्याचं काम नाना आणि मकरंद या दोन अवलियानी केलं.

या चळवळीने आज वेगवेगळ्या रूपाच्या कामाने समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. दुःख आत्मसात करून जगण्याची प्रेरणा निर्माण करण्याचं काम आणि आत्मविश्वास 'नाम' ने आपल्या कामातून निर्माण केला आहे. विधायक कामाचा वसा अव्याहत सुरु राहावा यासाठी शासन म्हणून कायम कटिबद्ध राहत सर्वोतपरी मदत करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: नात्यात दुरावा येतोय तर 'या' टिप्स फॉलो करा

Sanjay Bangar Son: आर्यन आता अनया झाली, संजय बांगरच्या मुलाची हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी

Mrudgandha Jivangaurav Puraskar Award 2024: पुरुषोत्तम बेर्डे यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार; लोककलेचा वारसा पुढे चालवणाऱ्यांचा होणार सन्मान

CBI Recruitment: CBI मध्ये नोकरीची संधी अन् भरघोस पगार; पात्रता काय?

Maharashtra Election: इकडे प्रचाराचा धुरळा, तिकडे काँग्रेसमध्ये कारवाईचा बडगा, 28 बंडखोरांना दाखवला बाहेरचा रस्ता

SCROLL FOR NEXT