Ghibli Trend 
महाराष्ट्र

Ghibli Trend: घिब्ली करेल बँक खातं रिकामं? नेमकं प्रकरण काय?

Ghibli Bank Fraud: तुम्हीही घिब्ली स्टाईल फोटो तयार केला आहे का? मग ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते, कारण घिब्लीमुळे तुमच्या बँक खात्यावर परिणाम होऊ शकतो, असा दावा केला जात आहे.

Dhanshri Shintre

संदीप चव्हाण/साम टीव्ही न्यूज

तुम्ही पण घिब्ली स्टाईल फोटो तयार केलाय का? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, घिब्लीमुळे तुमचं बँक खातं खाली होऊ शकतं असा दावा करण्यात आला आहे. खरंच असं होऊ शकतं का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात.

घिब्ली...घिब्ली काय आहे हे सांगायला नको. प्रत्येकाच्या मोबाईल घिब्ली स्टाईल फोटो नक्कीच असणार. कारण, सध्या देशभरात घिब्ली ट्रेंडिंग आहे. तुमचा फोटो ग्रोक अॅप, चॅट जीपीटीवरून कर्न्व्हर्ट केल्यावर घिब्ली स्टाईल फोटो तयार होतो. थोडक्यात काय तर आपला चांगला फोटो हा कार्टूनसारखा दिसतो आणि याच फोटोचं आपल्याला अप्रूप वाटतं. सगळ्यांनाच हे आवडू लागल्याने आपला घिब्ली स्टाईल फोटो कसा दिसतो हे पाहिलं जातंय. मात्र, तुम्हाला माहित आहे का? याच फोटोचा गैरवापर करून बँक खातं खाली होऊ शकतं. असा दावा करण्यात आला आहे. या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहा.

बनावट अॅप्स आणि स्कॅमरपासून सावध राहा. घिब्ली स्टाईल फोटो तुम्ही बनवत असाल तर स्कॅमर तुमच्या फोटोचा गैरवापर करू शकतात. तुमचं बँक खातं खाली होऊ शकतं. हा दावा गंभीर आहे. त्यामुळे आमच्या टीमने याची पडताळणी सुरू केली. खरंच फोटोचा गैरवापर होऊ शकतो का? याचा बँक खात्याशी काय संबंध? याची माहिती मिळवण्यासाठी एक्सपर्टशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली.

घिब्ली इमेजमुळे आपण कसे दिसतो याची माहिती जाते.

सायबर क्राईमपासून धोका, फोटोचा गैरवापर होऊ शकतो.

फेसचा वापर करून युपीआय अॅप उघडू शकतात.

बँक अकाऊंट रिकामं होऊ शकत नाही.

घिब्लीचा वापर अतिप्रमाणात करणं टाळायला हवं.

त्यामुळे आमच्या पडताळणीत घिब्लीमुळे बँक खातं खाली होऊ शकतं हा दावा सत्य ठरला आहे. तुम्ही जर या ट्रेंडचा अतिप्रमाणात वापर करत असाल तर सावधगिरी बाळगा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

SCROLL FOR NEXT