Loksabha 2024, sharad pawar, chhatrapati shahu maharaj, kolhapur news saam tv
महाराष्ट्र

Loksabha Election 2024: आनंदित झालेल्या शरद पवारांनी शाहू महाराज यांच्या लाेकसभेच्या तिकिटाविषयी स्पष्ट सांगितलं (पाहा व्हिडिओ)

Shahu Maharaj Kolhapur Latest Marathi News : जनतेच्या प्रश्नांसाठी शाहू महाराज नेहमी काेल्हापूरकरांसमवेत राहतात असेही शरद पवार यांनी नमूद केले.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Sharad Pawar In Kolhapur : संपूर्ण देशाला लोकसभा निवडणुकीचे (loksabha election 2024) वेध लागलेले आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (sharad pawar kolhapur marathi news) यांनी त्यांचा विविध जिल्ह्यात झंजावात दौरा सुरू केलेला आहे. गेले दाेन दिवस ते काेल्हापूरात तळ ठाेकून आहेत. या दाै-यात अनेक राजकीय, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी त्यांची भेट घेताहेत. (Maharashtra News)

शुक्रवारी कोल्हापुरात झालेल्या सभेत शरद पवार यांच्यासमवेत अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (chhatrapati shahu maharaj kolhapur) हे हाेते. या सभेत शाहू महाराज यांचे भाषण झाले. त्यांचे हे भाषण अनेकांना भावले. शरद पवार यांनी देखील आज (शनिवार) साम टीव्हीशी बाेलताना शाहू महाराज यांच्या भाषणाचे काैतुक केले.

शरद पवार म्हणाले शाहू महाराज सभेला आले याचा आनंद आहे. आम्हांला वाटलं ते सभेत फार बाेलणार नाहीत. परंतु त्यांनी सद्यस्थितीची सविस्तर मांडणी केली. जयंत पाटील (jayant patil) यांची आणि त्यांची काय चर्चा झाली हे माहित नाही. परंतु त्यानंतर शाहू महाराज यांनी परिस्थितीचे विश्लेषण केले. विराेधकांना एक दिशा दाखवल्याचेही पवारांनी नमूद केले.

दरम्यान शाहू महाराजांची लोकसभा लढण्याची इच्छा नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका प्रश्नावर म्हटलं. जनतेची इच्छा लक्षात घेऊन त्याचा सन्मान करण्याची भूमिका त्यांनी घेतली तर इथे बसलेल्या सर्वांना आनंदच हाेईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT