Beed Police Station विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed Crime: पत्नीच्या तक्रारीवरून पतीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल...

बीडच्या साक्षाळपिंप्री गावातील घटना

विनोद जिरे

बीड - 27 वर्षीय पीडित विवाहितेला माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणत, सतत शारीरिक व मानसिक छळ करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी नवऱ्यासह सासरच्या 3 मंडळींवर मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना बीडच्या (Beed) साक्षाळपिंप्री गावात उघडकीस आली आहे.

हे देखील पहा -

साक्षाळपिंप्री येथील पीडित 27 वर्षीय विवाहितेचा फिर्यादीवरून, तिचे माहेर पाटोदा तालुक्यात असून , 2012 मध्ये तिचा विवाह साक्षाळपिंप्री येथील आरोपी पतीशी झाला होता. लग्नानंतर काही दिवस सुखाचा संसार झाला मात्र त्यानंतर शेतीसाठी दोन लाख रुपये आणत नाही म्हणून तसेच घरकाम व शेतातील काम नीट येत नाही , अशी कुरापत काढत मारहाण करायचे. त्यामुळे पीडिता कधी माहेरी, तर कधी सासरी राहत असे.

या दरम्यान गेल्या 15 दिवसांपूर्वी तडजोडीसाठी बैठक झाली. तेव्हापासून ती सासरी होती. या दरम्यान तिचा विनयभंग केला. पीडितेने आरडाओरड केल्यावर जिवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाची फिर्याद 27 वर्षीय पीडित विवाहितेने दिली आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह दीर, सासरा, सासू यांच्यावर मारहाण व विनयभंगाचा गुन्हा नोंद झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea on empty stomach: सकाळी उठताच रिकाम्या पोटी चहा पिता? शरीराला होऊ शकतात ‘हे’ त्रास, आजच बदला तुमची ही सवय

Independence Day Movies: स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवा; देशभक्तीची भावना जागवणारे 'हे' ७ चित्रपट नक्की पाहा

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याचा लाभ कुणाला मिळणार? कोणत्या शेतकऱ्यांना फटका बसू शकतो?

मुग, मटकी, वटाणा... कडधान्य १ महिना खाल्ली नाहीत तर शरीरावर काय परिणाम होईल?

Shiv Sena Dispute: पक्षाची रचना आम्ही ठरवू, 'मुख्य नेता हे पद आलं कुठून?' कपिल सिब्बलांचा आक्रमक युक्तीवाद,आज कोर्टात काय-काय घडलं?

SCROLL FOR NEXT