chandrapur crime news  saam tv
महाराष्ट्र

प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने रचला हत्येचा कट; पोलिसांसमोर केले 'हे' धक्कादायक खुलासे

शिक्षक प्रियकराच्या मदतीने पत्नीने आजारी असलेल्या पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

Chandrapur Crime News : चंद्रपूर शहरात एक धक्कादायक हत्या प्रकरण उघडकीस आले आहे. शिक्षक(Teacher) प्रियकराच्या मदतीने पत्नीने आजारी असलेल्या पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने चंद्रपूर (Chandrapur) शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. (Chandrapur Crime News In Marathi )

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बालाडी वार्ड या घनदाट वस्तीत राहणाऱ्या मनोज रासेकर यांच्या पत्नीचे स्वप्निल गावंडे नामक शिक्षकाशी प्रेमसंबंध होते. यात वारंवार आजारी राहणारा पती अडसर ठरत होता. पतीचा काटा काढण्यासाठी दोन्ही आरोपींनी कट रचला. कटाप्रमाणे रात्रीच्या सुमारास घराचे दार मोकळेच ठेवले गेल्याने आरोपी शिक्षक-प्रियकर घरात शिरला. त्याने उशीने तोंड दाबून पतीची हत्या केली. आरडाओरडा झाल्याने दुसऱ्या खोलीत असलेली मनोजची आई घटनास्थळी पोचली.

मनोजची आई घटनास्थली आल्याने आरोपींनी प्लॅन 'बी' वापरत घटनेला लुटीचे स्वरुप दिले. घरातल्या कपाटातील सोने आणि वृद्ध आईच्या गळ्यातील सोन्याची पोत देखील शिक्षक आरोपीने धमकावून लांबवत घरातून पळ काढला. त्यानंतर सकाळी पत्नीने चोरी व मृत्यूबाबत पोलिसांत तक्रार दिली.

पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम समजून घेत मोबाईल कॉल डिटेल्स व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटविली. या हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी शिक्षक चंद्रपुरातील नामांकित शाळेत शिक्षक आहे. आपल्या पतीचा आजारपणात मृत्यू झाला. असा एकूण कट पत्नीने रचला होता. मात्र, तो असफल ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ये चला...विचारा..; आदित्य ठाकरेंच्या आवाजाची नितेश राणेंकडून खिल्ली|VIDEO

Green Colour Saree: श्रावणात सणासुदीसाठी नेसा या हिरव्या रंगाच्या सुंदर साड्या

Malvan Tourism : 'मालवण'मधील Hidden पिकनिक स्पॉट, पावसाळ्यात करा फुल टू धमाल

Yogesh Kadam : महाराष्ट्रात तुम्हाला मराठी बोलावंच लागेल, मराठी येत नसेल तर...; योगेश कदमांचा इशारा

Laxman Hake: भटक्या कुत्र्यासारखी हालत करू, महाराष्ट्रात फिरू देणार नाही; राष्ट्रवादी काँग्रेसचा लक्ष्मण हाकेंना इशारा

SCROLL FOR NEXT