पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात 'विधवा सुनही सासरची मुलगीच', असल्याचं मत व्यक्त केलंय. भरपाईपोटी दिल्या जाणाऱ्या नोकरीच्या प्रकरणामध्ये सुनेचे महत्त्व वाढविणारा निर्णय नागपूर हायकोर्टाने दिले आहेत. या प्रकरणी विधवा सुनेला 'वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेड' मध्ये नोकरी देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले (Nagpur News) आहेत.
संपूर्ण प्रकरण काय?
याप्रकरणात शितल मंगेश बेसुरवार असं दिलासा मिळालेल्या सुनेचे नाव आहे. ती चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील साखरी गावातील रहिवासी आहे.वेकोलीने त्यांचे सासरे आनंदराव बेसुरवार यांची जमीन संपादित केली (Widow Son In Law) आहे. बेसूरवार यांना दोन मुली आणि एक मुलगा होता. मुलगा मंगेश यांचा २ जून २०१६ रोजी मृत्यू झाला होता. शितल मंगेशची पत्नी होती.
न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा
मुलाच्या मृत्यूनंतर बेसूरवार यांनी सून शितल यांना नोकरी देण्याची मागणी केली होती. इतर वारसदारांनीही या मागणीचे समर्थन केलं होतं. परंतु वेकोलीने कुटुंबातील सदस्यांमध्ये सुनेचा समावेश होत नसल्याचे कारण देत ही मागणी नामंजूर केली होती. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) दिलेल्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला.
न्यायालयाचं मत काय?
याप्रकरणी न्यायालयाने (Bombay High Court) म्हटलंय की, विधवा सुन देखील सासरची मुलगीच आहे. त्यामुळे सुनेला मुलीप्रमाणे सर्व हक्क दिले जातील. यामुळे 'वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेड' नोकरी देण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे शितल बेसुरवार यांना मोठा दिलासा मिळालाय. वेकोलीने कुटुंबातील सदस्यांमध्ये सुनेचा समावेश होत नसल्याचं म्हटलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.