Bharat GogawaleM Saam Tv
महाराष्ट्र

Bharat Gogawale News: "एकाने सांगितलं माझी बायको आत्महत्या करेल..."; मंत्रिपदाला उशिर का झाला? भरत गोगावलेंनी सांगितला मजेशीर किस्सा

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

Alibag News: शिवसेनेमध्ये फुट पडून शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून रायगडमधील आमदार भरत गोगावले मंत्रिपदाच्या चर्चेत आहेत. मात्र अद्याप त्यांची वर्णी लागलेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांच्यासोबत आलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना देखील मंत्रिपद देण्यात आले आहे. मात्र भरत गोगावले अद्याप प्रतीक्षेत आहेत. याबाबत आता त्यांनी एकल मजेशीर किस्सा सांगितलाय. (Latest Marathi News)

भरत गोगावले यांनी मंत्रिपदाला उशिर का झाला याचा मजेदार किस्सा सांगितला आहे. "मंत्रिमंडळ विस्तारात माझाच नंबर होता परंतु मी थांबलो. एकाने सांगितले की माझी बायको आत्महत्या करेल, दुसऱ्याने सांगितले नारायण राणे मला जगू देणार नाही. तिसरा म्हणाला मला मंत्रिपद मिळाले नाही तर मी राजीनामा देतो. मी एकाला फोन केला अरे तुमच्या संभाजीनगरमध्ये पाचपैकी दोघांना दिली तुला काय घाई आहे, असे सांगून त्याला थांबवले. आम्ही थांबलो ते अजूनपर्यंत थांबलो." असे ते म्हणाले. अलिबागमधील एका पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आलेले शिवसेनेतील अनेक आमदार अद्यापही मंत्रिपदाची वाट पाहात आहेत. बंड केलेलेल्या आमदारांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर असल्याचं देखील म्हटलं जात आहे. १४ जुलै २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यावेळी कुणाला कोणतं खातं मिळणार यावरुन मोठी चढाओढ सुरू होती.

झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे फक्त वित्त व नियोजन हे खातं देण्यात आलं आहे.

इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे

- छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

- दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार

- राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास

- सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

- हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य

- चंद्रकांतदादा बच्चू पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

- विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास

- गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन

- दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

- संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण

- धनंजय पंडितराव मुंडे - कृषि

- सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार

- संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन

- उदय रविंद्र सामंत- उद्योग

- तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

- रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),

- गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता

- अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन

- दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा

- धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन

- अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण

- शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क

- अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास

- संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे

- मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता

- अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune CA Death Case: सीए तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडून दखल, चौकशीचे दिले आदेश; 'ईवाय’ कंपनीवर गंभीर आरोप

Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

SCROLL FOR NEXT