Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : फडणवीसांचे तीन शिलेदार सरकारविरोधातच का पेटले? जाणून घ्या कारण

साम टिव्ही ब्युरो

>> मयूर सावंत

Maharashtra Politics :

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या खूप चर्चेत आहेत. आरक्षणावरून मविआच्या नेते राज्य सरकारवर सतत टीका करताना दिसत आहेत. एकीकडे मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तीन शिलेदार आता सरकारविरोधातच पेटलेत. फडणवीसांचे हे तीन शिलेदार कोण? ते सरकारविरोधात का पेटलेत? याचबद्दल जाणून घेऊ...

देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आपली भूमिका मांडत सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा आरक्षणाचा तिढा निर्माण झालेला असतानाच गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाबाबत आपली भूमिका मंडळी आहे. याबाबत गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं आहे. डिसेंबर अखेरीस धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला केली आहे.  (Latest Marathi News)

गोपीचंद पडळकर यांच्या मागणीनंतर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दूध दरवाढीचा मुद्दा मांडला. दूध दरात वाढ करा अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल, असा इशाराच सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला दिलाय.

गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे अगदी जवळचे नेते बच्च कडू यांनी अजित पवार यांच्याविरोधात गंभीर आरोप केलाय. ओबीसी वादावरून राज्यात वादंग निर्माण झालाय. छगन भुजबळ सातत्याने ओबीसीबाबत भूमिका मांडत आहेत. पण भुजबळांच्या मताशी अजित पवार सहमत असल्याचा आरोप बच्चू कडूंनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची ढाल बनून उभे राहणारे हे तिन्ही नेते, अचानकपणे महायुती सरकारविरोधात वार का करू लागलेत. त्यामुळं आता फडणवीसांच्या या तिन्ही शिलेदारांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचं सरकार रोखणार का? त्यांच्या मागण्या पूर्ण करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT