शिवसेनेतील फुटीला दोन वर्षाहून अधिक काळ लोटला असला तरी खरी शिवसेना कुणाची हा राजकीय वाद अद्याप शमलेला नाहीय... याचं वादाचे थेट पडसाद हिवाळी अधिवेशानात विधानसभेतही उमटले... शिवसेना की शिंदेसेना या नावावरून विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली....
ठाकरेसेनेच्या वरुण सरदेसाईंनी वांद्रयातील शासकीय वसाहतीसंबंधात प्रश्न विचारताना दोनदा 'शिंदेसेना' असा उल्लेख केला. सरदेसाईंच्या तोंडी शिंदेसेना उल्लेखानं शंभुराज देसाई चांगलेच संतापले आणि शिंदेसेना की शिवसेना यावरून दोघांमध्ये खडाजंगी रंगली..
जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. या फुटीनंतर 'शिवसेना' हे पक्षनाव आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह कोणाकडे राहणार, हा कळीचा मुद्दा बनला. केंद्रीय निवडणूक आयोगाने बहुमताच्या आधारावर हे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला बहाल केलं... तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेना 'शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)' हे तात्पुरते नाव आणि 'मशाल' हे चिन्ह बहाल केलं...
मात्र तरीही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरेसेनेनं पक्ष आणि चिन्ह चोरल्याचा आरोप करत... शिंदेंसेनेला 'गद्दार', 'खोके सरकार' आणि शिंदेसेना म्हणत शिंदेंच्या शिवसेनेला चांगलचं डिवचलं....त्यात आता विधानसभेत झालेल्या वादांमुळे 'खरी शिवसेना कोणाची?' हा सवाल पुन्हा ऐरणीवर आलाय...या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या या वादात कायदेशीर लढाईचा मुद्दाही उपस्थित केला जातोय...
गेल्या 3 वर्षांपासून शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाचा खटला सुरु आहे.. त्यात सर्वोच्च न्यायालयानं 12 नोव्हेंबरची सुनावणी पुढे ढकलून 21 जानेवारी 2026 ला घेणार असल्याचं आदेश दिलेत... मात्र केवळ निवडणूक आयोग किंवा कोर्टाने नाव आणि चिन्ह एका पक्षाला दिल्याने हा राजकीय संघर्ष थांबणार नाहीय... जोपर्यंत कार्यकर्ते आणि सामान्यांच्या मनात 'शिवसेना' या नावाशी जोडलेली अस्मिता आणि वारसा कोणाकडे आहे, यावर शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत 'शिंदेसेना' की 'शिवसेना' हा वाद असाच सुरू राहणार...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.