Ramesh Bais Saam Tv
महाराष्ट्र

Ramesh Bais : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस कोण आहेत?

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ramesh Bais New Governor : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैस यांनी यापूर्वी झारखंडचे राज्यपाल म्हणून पदभार सांभाळला आहे. यासह देशातील १२ राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहे.

कोण आहेत रमेश बैस?

रमेश बैस सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. यापुर्वी जुलै 2019 ते जुलै 2021 त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणूनही काम केले होते. रायपूर लोकसभेचे सलग सहा वेळा खासदार निवडून आले आहेत. ऑक्टोबर 1999 ते सप्टेंबर 2000 केंद्रीय रसायन राज्यमंत्री म्हणून काम केले आहे.

सप्टेंबर 2000 ते जानेवारी 2003 केंद्रीय सूचना प्रसारण राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. जानेवारी 2004 ते मे 2004 केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे.बैस यांचा जन्म मध्य प्रदेशातील रायपूरमध्ये झाला आहे. आता रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते.

राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या १२ राज्यपालांची यादी

लक्ष्मण प्रसाद आचार्य - सिक्किम

शिव प्रताप शुक्ला -हिमाचल

गुलाब चंद्र कटारिया -असाम

बीडी मिश्रा - लद्दाख

रमेश बैस - महाराष्ट्र

अब्दुल नजीर - आंध्र प्रदेश

एल. गणेशन - नागालैंड

सीपी राधाकृष्णन - झारखंड

बिस्वास भूषण हरिचंदन - छत्तीसगढ

लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक - अरुणाचल प्रदेश

अनुसुईया उईके - मणिपूर

राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर - बिहार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

10 लाखांचे कर्ज काढले अन्...; घरकाम करणाऱ्या महिलेने 60 लाखांचा 3 BHK फ्लॅट खरेदी केला, प्रकरण कळताच नेटकरी हैराण

काँग्रेसच्या बड्या नेत्यासह कार्यकर्त्यांकडून धडाधड राजीनामे; शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली

Pimpri Chinchwad : मध्यरात्री कारवर बसून हुल्लडबाजी; तरुणांना जमिनीवर बसवून पोलिसांनी दिला चोप

Gold Price Hike: लक्ष्मीपुजनाच्या आधी सोनं महागलं तरी सराफ बाजारात झुंबड का? VIDEO

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित पवार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल

SCROLL FOR NEXT