Dussehra Melava  Saam Tv
महाराष्ट्र

Dussehra Melava : दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेला रुईकर आहे तरी कोण? ठाकरेंसाठी काय केलं होतं?

Dussehra Melava : दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका शिवसैनिकांची आठवण केली. त्या शिवसैनिकांचे नाव सुमंत रुईकर.

Bharat Jadhav

Who is Sumant Ruikar :

आझाद मैदानावर झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांशी देणघेणं नाही. त्यांना फक्त पैशाची देणंघेणं आहे, अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली. दरम्यान ठाकरेंवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिक रुईकर यांची आठवण केली. कोण हे सुमंत रुईकर? (Latest News)

आझाद मैदानावर झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी लाचारी पत्कारली. बाळासाहेबांनी ज्यांना दूर केलं त्यांनाच उद्धव ठाकरेंनी जवळ केलं. उद्धव ठाकरेंची बांधिलकी ही फक्त पैशांची आहे. बाळासाहेबांच्या गळा घोटण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. उद्धव ठकारेंना शिवसैनिकांशी काही देणंघेणं नाही,अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी एकनाथ शिंदेंनी सुमंत रुईकर यांची आठवण केली. रुईकर यांचा मृत्यू झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांची साधी आठवण देखील केली नाही. त्यांच्या कुटुंबियांचे साध्य सात्वन केलं नाही अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली.

कोण होते सुमंत रुईकर

सुमंत रुईकर हे एक शिवसैनिक. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे ते एक कट्टर शिवसैनिक होते. शिवसेनेसोबतचा त्यांचा प्रवास १९८४ मध्ये सुरू झाला होता. उद्धव ठाकरेच्या दिर्घायुष्यासाठी रुईकर यांनी तिरूपती बालाजीच्या दर्शनाला पायी जाण्याचा नवस केलं होता. त्यांनी बीड ते तिरूपती बालाजी असा ११०० किलोमीटरचा प्रवास केला होता. मात्र पायी जात असताना २५ डिसेंबरला कर्नाटकच्या रायचूर शहरात त्यांचा मृत्यू झाला होता.

या प्रवासादरम्यान रुईकर यांनी एक व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंसाठी कोणी शिवसैनिक पायी बालाजीला जात असल्याचं अख्या महाराष्ट्राला समजलं होतं. उद्धव ठाकरेंना दिर्घायुष्य लाभावं. येणाऱ्या निवडणुकीत महापालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकावा यासाठी आपण बालाजीपर्यंत पायी यात्रा करत असल्याचं या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान उद्धव ठकारेंसाठी केलेला नवस पूर्ण करताना मृ्त्यू झाल्यानंतरही ठाकरेंनी त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली. याची खंत रुईकर यांच्या पत्नीने माध्यमांसमोर बोलून दाखवली होती.

शिंदेंनी घर बांधून दिलं

एकनाथ शिंदेंनी रुईकर कुटुंबीयांना घर बांधून देण्याचा शब्द दिला होता. तो त्यांनी पूर्ण केला. २०२१ मध्येच घराचे भूमीपूजन होऊन बांधकामास सुरुवात झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT