Who is Salim Kutta Saam Tv
महाराष्ट्र

Who is Salim Kutta: कोण आहे सलीम कुत्ता?

Salim Kutta News: ठाकरे गटाच्या नेत्याशी संबंध असल्याचा आरोप झाल्यानंतर राज्यभरात सलिम कुत्ता हा कोण आहे? हे अनेक लोक गुगलवर सर्च करत आहेत. नेमका कोण आहे हा सलीम कुत्ता? हेच आपण जाणून घेऊ...

Satish Kengar

Who is Salim Kutta:

भाजप आमदार नितेश राणे यांनी आज ठाकरे गटाचे नाशिक शहराचे विद्यमान महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बडगुजर यांचे बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीम याचा उजवा हात समजला जाणाऱ्या सलीम कुत्ताशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या दोघांचा पार्टी करताना व्हिडीओही आपल्याकडे असल्याचं ते विधानसभेत म्हणाले आहेत.

यानंतर आता राज्यभरात सलिम कुत्ता हा कोण आहे? हे अनेक लोक गुगलवर सर्च करत आहेत. नेमका कोण आहे हा सलीम कुत्ता? हेच आपण जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोण आहे सलीम कुत्ता? (Who is Salim Kutta)

सलीम हा कुत्ता दाऊद इब्राहिम टोळीचा मुख्य शूटर होता. त्याचं खरं नाव मोहम्मद सलीम मीर शेख आहे. अनेक मोठ्या गुन्ह्यांच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग होता. सलीम हा कुत्ता दाऊदचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या छोटा शकीलसोबत (Chhota Shakeel) काम करत होता. (Latest Marathi News)

मुंबईत (Mumbai) त्याला फार कमी लोक ओळखत होते, त्यामुळे मुंबई पोलिसांपासून वाचत राहिला. तो 1993 मुंबईतील स्फोटातील (1993 Bombay bombings) मुख्य आरोपीही आहे. 1994 मध्ये सलीम कुत्ताला पकडण्यासाठी पोलिसांनी सुरक्षा यंत्रणांसह उत्तर प्रदेशातील नजीबाबाद परिसरात मोठा बंदोबस्त केला होता. मात्र सलीम या भागातून पळून गेला होता.

बॉम्ब स्फोटातील महत्वाचा आरोपी महोम्मद डोसा याच्याशी सलीम कुत्ताची जवळीक होती. त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला जन्मठेपची शिक्षा सुनावली होती. याविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने 2013 साली ही शिक्षा वैध ठरवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic Alert: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर दीड तासापासून वाहतूक कोंडी|Video Viral

Maharashtra Live News Update: गेवराई शहरातील महाविद्यालयीन तरूणी अपहरण प्रकरणात पोलिसांना यश

ऐन महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, प्रमुख नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Kranti Redkar: '... आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली'; क्रांती रेडकरने सांगितली छबिल-गोदोच्या जन्माची खास आठवण

Mirchi Bhaji Recipe: हॉटेलसारखी खुसखुशीत मिरची भजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT