Who is Rushikesh Bedre Saam Tv
महाराष्ट्र

Who is Rushikesh Bedre : अंतरवाली सराटीत झालेल्या दगडफेकीतील प्रमुख आरोपी ऋषिकेश बेदरे नेमका आहे तरी कोण?

Antarwali Sarathi News : अंतरवाली सराटीत झालेल्या दगडफेकीतील प्रमुख आरोपी ऋषिकेश बेदरे नेमका आहे तरी कोण?

साम टिव्ही ब्युरो

Antarwali Sarathi Lathicharge :

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु केलं होतं. त्यावेळी मोठी हिंसाचाराची घटना घडली होती. आता याप्रकणातील प्रमुख आरोपी ऋषिकेश बेदरे याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाली होती. १ सप्टेंबर २०२३ रोजी हा वादग्रस्त प्रकार घडला होता. आंदोलनातील झटापटीनंतर अंतरवाली सराटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं होतं. मराठा आरक्षणाच्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याचा आरोप केला गेला होता. या संपूर्ण घटनेनंतर राज्यात मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा आक्रमक झाला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंतरवाली सराटीत घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात आली होती. या चौकशीनंतर आता ऋषिकेश बेदरे याला प्रमुख आरोपी म्हणून बेदरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ऋषिकेश बेदरे याच्यावर राजकीय गुन्हे दाखल आहेत. (Latest Marathi News)

ऋषिकेश बेदरेची क्राईम हिस्ट्री काय आहे?

ऋषिकेश बेदरेची क्राईम हिस्ट्री आता पोलिसांच्या समोर आली आहे. अंतरवाली सराटीतील दगडफेक प्रकरणाचा प्रमुख आरोपी म्हणून ऋषिकेशवर संशय घेतला जातोय. ऋषिकेशवर बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

दगडफेक केल्याचा आरोप असलेला बेदरे मराठा आंदोलनामध्ये सक्रिय होता. १ सप्टेंबरच्या दुपारी अंतरवाली सराटी गावात पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला होता. या संघर्षाचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते. ही घटना घडून गेल्यानंतर मधल्या काळात राजकारण बरंच तापलं होतं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनाप्रकरणावरुन माफीही मागितली होती. तसंच जालन्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांची बदलीही करण्यात आली होती.

आता तब्बल दोन महिन्यांनंतर अंतरवालीतील संघर्षाप्रकरणी मोठी अटक करण्यात आली आहे. तसंच अटक करण्यात आलेल्या आरोपी ऋषिकेश बेदरे याच्याकडे गावठी पिस्तुलही आढळून आलं आहे. मनोज जरांगे यांनी अंतरवाली झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीत आपले आंदोलक नव्हते, असंही म्हटलं होतं. अंतरवाली सराटीतील आंदोलनात काही उपद्रवी लोकं घुसली होती, असा दाट संशय आता व्यक्त केला जातोय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT