Dolly Chaiwala Google
महाराष्ट्र

Dolly Chaiwala: अब्जाधीश बिल गेट्सनी टपरीवर घेतला चहाचा घोट, डॉली चहावाल्याची जगभर चर्चा

Rohini Gudaghe

Who Is Dolly Chaiwala

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Microsoft Founder Bill Gates) यांनी नुकतीच नागपूरच्या व्हायरल डॉली चायवाला यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी फुटपाथवर उभं राहून डॉलीच्या हातचा चहा तर प्यायलाच, पण त्याच्यासोबत रीलही बनवलं आहे. हे रील सध्या सर्वत्र व्हायरल झालं आहे. 24 तासांपेक्षा कमी कालावधीत याला 1 दशलक्ष लाईक्स मिळाले आहेत.(Latest Marathi News)

व्हिडिओमध्ये बिल गेट्स मजेदार पद्धतीने 'वन टी प्लीज' म्हणताना दिसत आहेत. त्यानंतर डॉली (Dolly Chaiwala) त्यांच्यासाठी खास चहा बनवतो. व्हिडिओमध्ये त्याची चहा बनविण्याची शैली तपशीलवार दिसत आहे. यानंतर बिल गेट्स यांना ग्लास ग्लासमध्ये डॉली चहा देत आहे. व्हिडीओमध्ये बिल गेट्स यांनीही आपण पुन्हा भारत भेटीसाठी उत्सुक असल्याचं सांगितलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डॉली चायवाला कोण आहे

हा व्हिडीओ शेअर करताना बिल गेट्सने (Bill Gates) लिहिलंय की, भारतात सर्वत्र नावीन्य आढळते. तुम्ही कुठेही जा, तिथे नावीन्य सापडते. इथे साधा चहासुद्धा छान मिळतो. व्हिडिओच्या शेवटी त्यांनी म्हटलंय की, त्यांना चहावर आणखी चर्चा करायला आवडेल. बिल गेट्स यांनीही आपण पुन्हा भारत भेटीसाठी उत्सुक असल्याचं सांगितलं आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले (Who Is Dolly Chaiwala) आहेत. स्विगी इंडियाने या व्हिडीओवर कमेंट करत या चहाचं बिल किती आहे, असं विचारलं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयाला धक्का बसल्याचं यूजर्स सांगत आहेत.

प्रसिद्ध सोशल मीडिया व्यक्तिमत्व

डॉली चायवाला एक प्रसिद्ध सोशल मीडिया व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये त्याची एक वेगळी ओळख आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, तो बऱ्याच दिवसांपासून नागपूरच्या रवींद्र टागोर सिव्हिल लाईनजवळ चहा विकत ((Dolly Chaiwala Tea) आहे. तो आपल्या स्टाईलने ग्राहकांचं लक्ष वेधून घेतो. प्रत्येकजण त्याचा व्हिडिओ बनवण्यास उत्सुक असतो.

डॉली चायवालाचा व्हिडीओ बनवून अनेकजण खूप प्रसिद्ध झाले आहेत. त्याच्या एवढ्या प्रसिद्ध होण्यामागचे कारण म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स (Dolly Chaiwala Tea To Bill Gates) आहे. बिल गेट्सचा डॉली चायवाल्यासोबतच व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकं गंमतीने विचारत आहेत की, डॉली चायवाला नावाचा हा गृहस्थ कोण आहे? अशा प्रकारे दिवसेंदिवस डॉली चायवाला प्रसिद्ध होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale: कोण होणार बिग बॉस मराठी सीझन ५ चा विजेता? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर, एकमताने पुण्यात निवड

VIDEO : तिरूपती बालाजीच्या प्रसादात किडे? धक्कादायक माहिती आली समोर

Marathi News Live Updates : नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

SCROLL FOR NEXT