Who is Abhijit Vanjari Congress leader from Nagpur Saam TV
महाराष्ट्र

भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा झेंडा! देशात फक्त एकच जागा मिळाली? कोण आहेत अभिजीत वंजारी, ज्यांनी वाचवली पक्षाची लाज?

Who is Abhijit Vanjari Congress leader from Nagpur : नागपूर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजपच्या सुधाकर कोहळे यांचा पराभव करत विजय मिळवला. कोण आहेत अभिजित वंजारी?

Namdeo Kumbhar

MLC Election Results Who Is Abhijit Vanjari : आरएसएस आणि भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपुरात काँग्रेसने मोठा विजय मिळवत सर्वांनाच चकित केले. चार राज्यात २८ जागांवर शिक्षक-पदवीधरच्या निवडणुका होत्या. या विधान परिषद निवडणुकीच्या निकालांमध्ये काँग्रेस पक्षाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी ट्वीट करत काँग्रेसने किती जागा जिंकल्या? असा सवाल उपस्थित केला होता. काँग्रेसला २८ पैकी एकही जागा मिळणार नाही, अशीच बिकट परिस्थिती होती. पण नागपूर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी बाजी मारली. अत्यंत अटीतटीच्या व चुरशीच्या लढतीत त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा ३,२७१ मतांनी पराभव करत आपली जागा राखली.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे अभिजित गोविंदराव वंजारी यांना 67,231 मते मिळाली. भाजपचे सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांना 63,960 मते मिळाली. सुधाकर कोहळे यांना पहिल्या फेरीपासूनच आघाडी मिळाली होती. पण दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये आणि शेवटच्या टप्प्यात बाजी पूर्ण फिरली. अभिजित वंजारी यांनी सनसनाटी विजय मिळवत देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.

कोण आहेत अभिजीत वंजारी?

अभिजीत वंजारी हे व्यवसायाने वकील आहेत. त्यांचा काँग्रेस पक्षाशी दीर्घकाळ संबंध आहे. त्यांचे दिवंगत वडील गोविंदराव वंजारी हे दक्षिण नागपूरमधून दोन वेळा काँग्रेसचे आमदार होते. त्यामुळे या भागात त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा मोठा प्रभाव आहे. अभिजीत वंजारी यांनी नागपूर विद्यापीठातून बीए आणि कायद्याची पदवी घेतली आहे. त्यांनी त्याच विद्यापीठाच्या सिनेटवरही काम केले आहे. अभिजित वंजारी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात विद्यार्थी राजकारणातून केली. १९९८ ते २००२ पर्यंत वंजारी यांनी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे (एनएसयूआय) महाराष्ट्र राज्य सरचिटणीस म्हणून काम केले. त्यांनी युवक काँग्रेस आणि नागपूर जिल्हा काँग्रेसमध्येही विविध पदे भूषवली आहेत.

अभिजीत वंजारी यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकांमध्ये पक्षाचे निरीक्षक म्हणूनही काम केले आहे. वंजारी हे विदर्भातील अभियांत्रिकी, फार्मसी, कायदा, व्यवस्थापन आणि पदवी महाविद्यालये चालवणाऱ्या 'अमर सेवा मंडळ' या गैर-सरकारी संस्थेचे सचिव आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, वंजारी हे 'गोविंद अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी'चे अध्यक्ष आहेत. ते 'गोविंदराव वंजारी फाउंडेशन' चालवतात.

विधान परिषद निवडणुकीपूर्वी वंजारी यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. २००५ मध्ये दक्षिण नागपूर विधानसभा पोटनिवडणूक आणि २०१४ मध्ये पूर्व नागपूर विधानसभा निवडणूक त्यांचा पराभव झाला होता. २०२० मध्ये त्यांनी विधान परिषद निवडणुकीत भाजपचे संदीप जोशी यांचा १८,९१० मतांनी पराभव करून नागपूर पदवीधर मतदारसंघ जिंकला. यावेळीही त्यांनी ही जागा पुन्हा जिंकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, ११ आरोपीना आज कोर्टात हजर करण्यात आले

Money Plant : घरात मनी प्लांट ठेवताना 'या' 3 गोष्टी लक्षात ठेवाच

ठाणे पोलिस स्टेशनबाहेर शिवसैनिकांची तुफान गर्दी; दोन्ही शिवसेना एकमेकांच्या विरुद्ध; आदित्य ठाकरेही पोहोचले|VIDEO

Ratri Velchi Khanyache Fayde Kay: रोज रात्री वेलची खाल्ल्याने शरीरात होतील आश्चर्यकारक बदल! जाणून घ्या 3 जबरदस्त फायदे

Healthy Cooking : फक्त १ तमालपत्र बदलेल भाताची चव आणि आरोग्य! जाणून घ्या जबरदस्त फायदे

SCROLL FOR NEXT