बीड दौऱ्यावर असताना जयंत पाटील यांनी केली पूरपरिस्थितीची पाहणी  twitter/@NCPspeaks
महाराष्ट्र

बीड दौऱ्यावर असताना जयंत पाटील यांनी केली पूरपरिस्थितीची पाहणी

बीड दौऱ्यावर असताना जयंत पाटील यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली आहे. तसेच ते अधिकांऱ्यांशी फोनवरून संवाद साधतायत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

बीड: जालना, परभणी व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कालपासून मुसळधार पाऊस पडत असून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी आज सकाळी बीड येथे नुकसानग्रस्त भागात जाऊन स्वतः पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. (While on a tour of Beed, Jayant Patil inspected the flood situation)

हे देखील पहा -

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने पक्षाचा विभागीय आढवा घेण्यासाठी जयंत पाटील सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. काल संध्याकाळपासून या भागात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे पक्षाच्या बैठका थोड्या उशिरा आयोजित करत पाटील यांनी या पूरग्रस्त भागांची पाहणी केली.

''मराठवाड्यात अनेक ठिकाणी पुराचे पाणी हे नदी-नाले सोडून बाहेर आले आहे. यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी आम्ही करत आहोत. मी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. जायकवाडी धरणावर देखील आमचे लक्ष आहे,'' असं ते म्हणाले.

नाशिक जिल्ह्यात तसेच जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात किती पाऊस झाला याची माहिती घेऊन पुढे काय परिस्थिती उद्भवेल याचा अंदाज घेतला जात आहे. प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जलसंपदा विभाग कालपासून सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे. नुकसान कमीत कमी व्हावे हा आमचा प्रयत्न आहे. मांजरा धरणाची देखील दारे उघडण्याची स्थिती उद्भवली आहे. नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे असं त्यांनी आश्वासन दिलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Diet: साखरेवर नियंत्रण ठेवायचंय? तर डायबिटीजच्या रुग्णांसाठी अमृत असणारं हे हिरवे पान खा

गर्लफ्रेंडचं लग्न झालं, 24x7 लक्ष ठेवण्यासाठी बॉयफ्रेंडनं झुडुपात कॅमेरा बसवला, पतीनं पाहताच.. नेमकं घडलं काय?

सांगलीमध्ये पुन्हा राजकारण तापलं; जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात पॉलिटिकल वाॅर, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

Satyajeet Tambe: सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार का? विखे-पाटलांना नो इश्यू! आता थोरात मामांनीही केलं क्लिअर

SCROLL FOR NEXT