No bra day साजरा करू, तेव्हा हेमांगीने सहभागी व्हावं - तृप्ती देसाई Saam Tv News
महाराष्ट्र

No bra day साजरा करू, तेव्हा हेमांगीने सहभागी व्हावं - तृप्ती देसाई

आपल्या फेसबुक पोस्टवरुन चर्चेत आलेली मराठी अभिनेत्री हेमांगी कवीला भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी No Bra Day मध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्या फेसबुक पोस्टवरुन facebook post चर्चेत आलेली मराठी अभिनेत्री हेमांगी कवीला marathi actress hemangi kavi भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई president of bhumata brigade trupti desai यांनी No Bra Day मध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. बाई, बुब्स आणि ब्रा या विषयावर अभिनेत्री हेमांगी कवीने आवाज उठवला होता, त्यानंतर ती चर्चेत आली. स्त्रियांची अंर्तव्रस्त्रे आणि त्यासाठी असलेला सामाजिक दबाव, सोशल मीडियावरील ट्रोलिंग यावर हेमांगीने फेसबुकच्या माध्यामातून आवाज उठवला होता. अनेकांनी तिचं समर्थनही केलं होतं. अभिनेते प्रविण तरडे pravin tarde यांनीही हेमांगीचं समर्थन केलं. तृप्ती देसाईंनीही या हेमांगीच्या लेखाचं स्वागत केलं, पण याअगोदर कुठे होत्या अशी विचारणा करत टीकाही केली. When we celebrate the day of no bra, join Hemangi, said Trupti Desai

हे देखील पहा -

नक्की काय म्हणाल्या तृप्ती देसाई?

हेमांगीवर टीका करत तृप्ती देसाई म्हणाल्या की, जेव्हा आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोडच्या dresscode of shirdi विरोधात रान पेटवले तेव्हा कुठे होत्या मला माहित नाही. जेव्हा महिलांना मासिक पाळी periods या विषयावरून दुजाभाव केला जातो, अनेक ठिकाणी बंदी घातली जाते. याविषयावर आम्ही आंदोलने केली परंतु अशा वेळेला असे लोक का साथ देत नाहीत हे समजले नाही. इंदुरीकर indurikar maharaj तर जाहीरपणे महिलांच्या वेशभूषेवर आणि महिलांबाबत बदनामीकारक वक्तव्य अनेक कीर्तनातून करत असतात, त्यावेळेला हे सर्व कुठे होते असाच प्रश्न पडतो? असो उशिरा का होईना परंतु धाडस करून लिहायला तरी सुरुवात केली “हे ही नसे थोडके”. मनापासून शुभेच्छा. माझी तर या जानेवारीपासूनच मनात एक संकल्पना आहे. ती अशी की, आमच्या भूमाता फाऊंडेशनच्या माध्यमातून यावर्षीपासून आपल्या महाराष्ट्रात” #नो_ब्रा_डे” no bra day साजरा केला पाहिजे. कृतीतून जेवढा संदेश जाईल तेवढा बदल होण्यास सोपे जाते. विरोध तर होईलच परंतु पुढाकार घेऊन करणेही तितकेच गरजेचे आहे. आम्ही जेव्हा हा दिवस साजरा करू तेव्हा स्वतःहून तुम्ही यात सहभागी व्हाल हीच अपेक्षा. असं आवाहन तृप्ती देसाईंनी केलं आहे. यावर हेमांगीने अद्यापतरी काही प्रतिक्रीया दिलेली नाही.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT