MLA Ram Satpute On Sawangi Magrapur Dalit Water Issue In Amravati Saam TV
महाराष्ट्र

Amravati: "आघाडीची सत्ता आली की दलित-शोषितांवर अत्याचार वाढतात" - भाजप आ. राम सातपुते

No Water in Dalit Area in Amravati: दरम्यान साम टिव्हीनं ही बातमी लावून धरली होती. सामच्या बातमीच्या पाठपुराव्यानंतर आता या गावात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु झाले आहे.

साम टिव्ही

सुशांत सावंत

अमरावती: अमरावतीच्या सावंगी मग्रापूर (Sawangi Magrapur) गावात पाण्यासाठी दलितांनी (Dalits) गाव सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. गावात गेल्या 28 दिवसांपासून पाणीपुरवठा (Water Supply) केला नाही असा आरोप येथील नागरिक करत आहेत. अमरावतीतील (Amravati) ही दलित वस्ती (Dalit Area) असल्यामुळे उपसरपंचांनी हे जाणीवपूर्वक केल्याचा आरोप सुद्धा झाला. आता या वादात भाजपनेही उडी घेतली आहे. अमरावतीच्या म्हाळशिरस विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी या प्रकाराबाबत महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) टीका केली आहे. "आघाडीची सत्ता आली की दलित,शोषित घटकावर अत्त्याचार वाढतात" अशी खोचक टीका त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. ("When the alliance comes to power, atrocities against dalits and exploiters increase" - BJP mla Ram Satpute)

हे देखील पहा -

आमदार राम सातपुते म्हणाले की, "फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावानं मत मागून, इथल्या वंचीत शोषित घटकांच्या भावनांचा खेळ करत सत्ता उपभोगणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने आज दलितांवर पाण्यासाठी पुन्हा सत्याग्रह करण्याची वेळ आणलीये."

अमरावतीच्या सावंगी मग्रापुर गावातल्या दलित बहूल वॉर्डात महिनाभरापासून पाणी नाही. गावातील सरपंचांनी हेतूपूरस्पर पाण्याचे कनेक्शन तोडले आहेत. जीवघेण्या थंडीत आमच्या आई-बहिणी गावच्या वेशीवर ठिय्या मांडून बसल्या होत्या. अनेकांनी गाव सोडून दिलंय. हा फक्त पाण्यापुरता विषय नाही. हा सरळ-सरळ तुम्ही सामाजिक बहिष्कार घालत आहात. हा मोठा गुन्हा आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेनी (Dhananjay Munde) या प्रकरणाची दखल घेत समिती स्थापन करून तातडीने चौकशीचे आदेश दिले पाहिजेत.

वंचित घटकांच्या कल्याणासाठी उभारलेली बार्टी (Barti) संस्थाही लाभ देण्यासाठी सावकारसारखं वागते, बिलं काढण्यासाठी तुम्हाला पार्ट्या द्यावा लागतात. या संस्था म्हणजे आपल्या जहागिऱ्या नाहीत याचे भान ठेवा. मा. धननंजय मुंडे हा भोंगळ प्रकार कुणाच्या आशिर्वादानं सुरू आहे? आघाडीची सत्ता आली की दलित, वंचित, शोषित घटकांवर अत्त्याचार वाढतात ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे. आता लवकरात लवकर संबंधित सरपंच, उपसरपंचावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आमदार राम सातपुते यांनी केली आहे.

दरम्यान साम टिव्हीनं ही बातमी लावून धरली होती. सामच्या बातमीच्या पाठपुराव्यानंतर आता या गावात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु झाले असून ते लवकर पुर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र आता या घटनेमुळे राज्यात राजकारण चांगलचं तापलंय.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: बापरे बाप... चक्क काकूंनी सापांना कपड्यांसारखे धु धु धुतले; व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल...

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

SCROLL FOR NEXT