तृतीयपंथीयांना कोरोनाची लस दिली
तृतीयपंथीयांना कोरोनाची लस दिली 
महाराष्ट्र

दारातील कोविड लसीकरणामुळे जेव्हा सारे किन्नर भावूक होतात !

Pralhad Kamble

नांदेड : मला जन्म कुणी दिला हे माहित नाही. माझी गुरु सांगते तुला आमच्यापाशी कुणीतरी आणून टाकले. तिचीच सेवा करत मी मोठी झाले. लहानपणी स्वाभाविकच मलाही खेळायचे प्रचंड वेड होते. सारीच मुले कधी मला गोल्या म्हणायचे, कोणी मामू म्हणायचे तर कुणी खूप काही. मला काही त्यांचे त्यावेळी वाईट वाटायचे नाही. न मी त्यांचे कधी वाईट वाटून घेतले. माझ्यातल्याच गुरुने मला मोठे केले. माझे नाव विचाराल तर तसे मलाही नक्की सांगता येणार नाही. प्रत्येक माणसाने मला वेगळे नाव दिले आहे. मला गणपतीची खूप आवड. एक छोटा गणपती मी असाच एका दुकानदाराकडून मागून घेतला. विकत नाही. आम्ही थोडीच काही विकत घेतो ? तेव्हा कुणीतरी मला गणेश की गौरी असे नाव दिले. मलाही हे नाव सगळ्या नावापेक्षा जास्त भावले. तेव्हापासून मग मी गौरी झाले. कोरोना लसीकरणाच्या निमित्ताने समाज आणि किन्नर यातील एक एक पदर ती उलगडून दाखवत होती.

माझ्यासारख्या अनेक गौरी आणि त्यांचे दु:ख सारखेच पाहून आम्हाला आता याचे कुणालाच काही वाटत नाही. समाज आम्हाला काही कमी करतो अशातला भाग नाही. आमच्या वेदना घेवून आम्ही जगतो. एकमेकींचे मन आम्ही एकमेकीना बिनधास्त लाखोळी वाहूनही हलके करुन घेतो. समाज जे काही म्हणायचे आहे ते आम्हाला म्हणत राहतो, त्यामूळे आम्ही त्यांची फारशी पर्वाही करत नाही. वारंवार शल्य मात्र एकाच गोष्टीचे राहते ते म्हणजे सरकार दप्तरी आवश्यक असणारी ओळख.

हेही वाचा - Lockdown च्या अंमलबजावणीस प्रारंभ; सांगलीतील व्यापारी नाराज

आधार काढायला जावे तर नाव लागेल. नाव सांगायला जावे तर तलाठी किंवा ग्रामपंचायत अशा ठिकाणच्या नोंदी लागतील. वय सांगायला जावे तर जन्माचा दाखला किंवा टीसी लागेल. न आम्ही या कागदात मोडतो न त्या कागदात. आमची ही व्यथा जवळपास सर्वच गावात सारखी आहे. अनेक वर्षे झेललेल्या या व्यथेला आता राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्गंत एक अश्वासक चित्र आम्ही पाहत आहोत. इथले जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना या साऱ्या व्यथा आम्ही घेवून भेटलो. राहण्याच्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यतचे आमचे प्रश्न त्यांनी शांततेत ऐकून घेतले. साधी कोरोनाची लस घ्यावी तर पुन्हा हा सरकारी दप्तरात आवश्यक असणारा ओळखीचा कागद अर्थात आधारकार्ड अथवा इतर ओळखपत्र देणे आवश्यक होते.

शासनाने तृतीयपंथी तक्रार निवारण समिती नेमल्यामूळे आम्हाला आमच्या भावना मांडता आल्या. याचे अध्यक्ष स्वत: जिल्हाधिकारी असल्याने त्यांच्याशी थेट संपर्क झाला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यात अत्यंत प्रगल्भ अशी भूमिका निभावून लसीकरणाचा हा लाभ आमच्या वसतीत येवून दिला. याबद्दल गौरी विशेष आभार मानायला विसरली नाही.

येथे क्लिक करा - मुंबईला यायचा विचार करताय? तर 'या' प्रवाशांना मिळणार RT-PCR चाचणीमधून सूट

याचबरोबर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी, महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपायुक्त अजितपालसिंह संधु, आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन व त्यांची टिम, तत्परतेने पुढे झाल्याबद्दल गौरी देवकर यांनी कृतज्ञतेने आभार मानले. यावेळी किन्नराची वरिष्ठ गुरु शानुर बाबु बकश यांची विशेष उपस्थिती होती. या लसीकरण कॅम्पच्या यशस्वीतेसाठी अर्चना शानूर बकश, रेश्मा बकश, शेजल बकश, दिपा बकश, कमल फाउडेशनचे अध्यक्ष अमरदिप दिगंबर गोधने, समाजकल्याण विभागाचे दिनेश दवणे, कैलास राठोड यांनी प्रयत्न केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips : 'या' गोष्टींमुळे तुमचाही ब्रेकअप होऊ शकतो; जाणून घ्या आणि नातं तुटण्याआधीच वाचवा

Rashi: 1 मेपासून गुरूचे राशी परिवर्तन, तुमच्या राशीला कितवा गुरू आलाय? जाणून घ्या...

Pune News: आंबे तोडण्यासाठी झाडावर चढला अन् बेशु्द्ध होऊन अडकला, पुण्यातील तरुणासोबत विपरितच घडलं!

Nashik Lok Sabha: महायुतीचं अखेर ठरलं! नाशिकमधून 'या' नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब? आज होणार घोषणा!

Petrol Diesel Rate 1st May 2024: महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेलचा भाव किती? जाणून घ्या आजच्या किंमती

SCROLL FOR NEXT