हे काय? शिवसेनेच्या बॅनरवरुन चक्क उद्धव ठाकरेच गायब, राऊतांचा मात्र मोठा फोटो... अभिजीत सोनावणे
महाराष्ट्र

हे काय? शिवसेनेच्या बॅनरवरुन चक्क उद्धव ठाकरेच गायब, राऊतांचा मात्र मोठा फोटो...

लोकार्पण सोहळ्याच्या मुख्य फलकावरून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो गायब होता, मात्र संजय राऊतांचा मोठा फोटो या फलकावर होता.

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक: शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत हे आज नाशिकमध्ये आले होते. या प्रसंगी शिवसैनिकांनी ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतिषबाजी करत राऊतांच स्वागत केलं. राऊतांच्या हस्ते नाशिक महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या रुग्णलयाला हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालय नाव देऊन हस्ते लोकार्पण केलं गेलं. त्याचप्रमाणे नाशिक महापालिका नाशिकरोड विभागीय कार्यलयाचा नामकरण सोहळाही पार पडला. यात राजमाता जिजाऊ मासाहेब विभागीय कार्यलयाला नामकरण करण्यात आल. यावेळा लक्षवेधी ठरलेली बाब म्हणजे कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या लोकार्पण सोहळ्याच्या मुख्य फलकावरून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो गायब होता, मात्र संजय राऊतांचा मोठा फोटो या फलकावर होता त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलयं. (What is this? Uddhav Thackeray has disappeared from the Shiv Sena banner, but has a big photo of sanjay Raut)

हे देखील पहा -

आपल्या भाषणात शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना राऊत म्हणाले की, महापालिका निवडणुकीत आपली कामंच आपल्याला पुढे घेऊन जातील.आगामी निवडणुकीत विरोधी पक्षातील शिवसेना सत्ता स्थानी असेल असं वातावरण आहे. काम ही शिवसेनेची ओळख आहे. ही महापालिका भगव्या झेंड्या खाली जिंकून आणू त्यासाठी नगरसेवकांनी कष्टाने काम केलं पाहिजे, त्यामुळे नाशिककर लक्षात ठेवतील.

नाशिक आमच्यासाठी नवीन नाही, मी कालपासून नाशिकमध्ये आहे. आज सकाळपासून अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं. नाशिकमध्ये शिवसेना विरोधीपक्षात असली, तरी सत्ताधाऱ्यांना लाजवेल, असं काम करत आहे, असं राऊत म्हणाले. तसेच दादरा-नगर-हवेलीची जागा शिवसेना लढवणार आणि जिंकणार, महाराष्ट्राबाहेर शिवसेना प्रथम खातं खोलणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

विरोधकांवर बोलताना राऊत म्हणाले की, ते कावळे नसतील ते डोमकावळे असतील. मी दिल्लीत राहतो, तिथे मोर पण आहेत. डोमकावळे कितीही फडफडले तरी त्यांना काही महाविकास आघाडी सरकार पाडण्याची सुपारी फोडता येणार नाही. मी माझ्या पक्षासाठी कोणतेही घाव झेलण्यास तयार आहे. सरकार आणण्यासाठी मी खूप खटपटी, लटपटी केल्या त्याला यश आलं. पुलोद नंतर प्रथमच असं सरकार आलं, पुलोदचे शिल्पकार शरद पवार आपल्यासोबत आहे.

महाराष्ट्र हे तुळशी वृंदावन आहे, इथं तुळशीचं पीक जास्त आहे. पण काही लोकांना वाटतं की या राज्यात काही गांजा, भांग आपण पिकवू. पण ते शक्य नाही. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचे घाव तुम्ही किती करणार आमच्यावर? मी मागे म्हणालो होतो, की यातूनही सरकार पडत नसेल, तर आर्मीला बोलवा. आता आर्मीच राहिली आहे, बाकी सगळं झालंय. उद्धव ठाकरे, शरद पवार, गांधी कुटुंबाचंही तेच म्हणणं आहे की, हे सरकार ५ वर्ष टिकेल आणि भविष्यातही आम्ही एकत्र राहून काम केलं, तर २५ वर्ष हे सरकार हलणार नाही”, असा दावा यावेळी संजय राऊतांनी केला.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : कसब्याची जनता मला पुन्हा निवडून देईल- रवींद्र धंगेकर

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT