Supreme Court
Supreme Court Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरणार? नबाम रेबिया प्रकरणात काय झालं होतं?

Shivaji Kale

Maharashtra Politics : आज सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावर सुनावणी होतं आहे. यामध्ये शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरणार का यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. सत्तासंघर्षावर सुनावणी करताना कलम २१२ नुसार या प्रकरणाचा विचार करावा असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. तर शिंदे गटाने या प्रकरणावर नबाम रेबिया प्रकरणाप्रमाणे निकाल देण्यात यावा असं म्हटलं आहे. अशात आता हे नबाम रेबिया प्रकरण नक्की काय आहे हे समजून घेऊ. (Latest Maharashtra Politics )

काय आहे नबाब रेबिया प्रकरण?

साल २०१६ मध्ये नबाम तुकीचं सरकार अरूणाचलमध्ये सत्तेत आलं होतं. अवघ्या काही महिन्यानंतर २७ आमदारांनी बंड केलं. सर्व बंड करणारे आमदार दिल्लीला पोहोचले. नबाम तुकी यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा यासाठी आमदारांनी हे बंड केलं होतं.

विधानसभा अध्यक्ष नबाम रेबिया बंड करणाऱ्या आमदारांची सदस्यता रद्द करणार होते. मात्र त्या आधीच अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल जे पी राजखोआ यांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याशिवाय राज्यपाल जे पी राजखोआ यांनी नबाम रेबिया यांना हटवण्यासाठी १६ डिसेंबर २०१६ रोजी विधानसभेचं सत्र बोलावण्याचे आदेश दिले.

राज्यापालांच्या निर्णयाच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष नबाम रेबिया यांनी उच्च न्यायालयात अपील केलं. उच्च न्यायालयाने राज्यपालांच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती शासन परत घेण्याचे आदेश दिले होते.

काय होता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय?

या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीशिवाय राज्यपाल विधानसभा सत्र बोलावू शकत नाही. राज्यपाल जे पी राजखोआ यांचा निर्णय असंवैधानिक होता, असा निर्णय दिला होता. मात्र,सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री नबाम तुकी यांची याचिका फेटाळली होती. यानंतर तुकी विधानसभेत सरकार स्थापन करू शकले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एसीबीच्या ताब्यात; मजुरांचे पैसे काढण्यासाठी मागितली ५ हजारांची लाच

Benifits of Pomogranate Peel: डाळिंबाची साल कचरा समजून फेकून देताय का? जाणून घ्या आरोग्यादायी फायदे

Bhandara News: पिकविम्यात शेतकऱ्यांची थट्टा! नुकसान भरपाई म्हणून मिळाले १०००, १२०० रुपये; बळीराजाचा संताप

Bhavesh Bhinde Arrest : दया नायक यांच्या टीमने भावेश भिंडेला केली अटक, मुंबईत दाखल

Prajakta Mali: सप्तरंगात न्हाऊन निघाली प्राजक्ता माळी...

SCROLL FOR NEXT