Sharad Pawar Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar: राष्ट्रवादीचा वंचित बहुजन आघाडीला हिरवा कंदील?; युतीबद्दल काय म्हणाले शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: या युतीसाठी हिरवा कंदील दाखवला आहे.

Ruchika Jadhav

Sharad Pawar: गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीची चर्चा सुरू आहे. या युतीवर राष्ट्रवादी नाराज असून विरोध करत असल्याचे म्हटले जात होते. मात्र आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: या युतीसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या काही गटांना आम्ही बरोबर घेणार आहोत, यावर सध्या कोणताही नर्णय झालेला नाही चर्चा सुरू आहेत, असे शरद पावारांनी सांगितले आहे. (Latest Sharad Pawar News)

महाविकास आघाडी प्रत्येक मुद्दयावर एकत्रीत निर्णय घेते. त्यामुळे निवडणुकीत एकत्रीत भूमिका घेण्यास कोणातीही अडचण येणार नाही. महाविकास आघाडी विधानसभा आणि लोकसभा या निवडणूकीत एकत्रच असेल असा आमचा प्रयत्न आहे. यात रिपब्लिकन पक्षातील काही गट सहभागी होण्यास इच्छूक आहेत. सध्या आम्ही यावर चर्चा करत आहोत. लवकरच अंतिम निर्णय तुमच्या समोर येईल, असे शदर पवार म्हणाले. शरद पवारांनी कोल्हापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत यावर आपले मत व्यक्त केले. यासह त्यांनी अन्य काही विषयांवर देखील भाष्य केले आहे.

तर, संघर्ष होणारचं तो थांबणार नाही

राज्यात सध्या महापूरांषांवरील वक्तव्याने काही नेतेमंडळी चर्चेत आहेत. सातत्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यावर शरद पवार म्हणाले की, " मदभेद जर आमच्यात असते, तर ती वेगळी गोष्ट आहे. मात्र सध्या भाजप आणि राष्ट्रवादी, भाजप आणि कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेना असा संघर्ष दिसत आहे. त्यामुळे हा संघर्ष होणारच तो काही थांबणार नाही, असं देखील शरद पवारांनी म्हटलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याने गेल्या महिन्यात राजकारण चांगलचं तापलं होतं. अशात आपण नाखूश असल्याचं मत राज्यपालांनी व्यक्त केलं होतं. यावरून देखील शरद पवारांनी राज्यपालांना कोपरखळी दिली आहे. " महाराष्ट्रातल्या राज्यपालांची एक परंपरा आहे. आजवर आम्ही चांगले राज्यपाल पाहिले. मात्र सध्याचे राज्यपाल नाखूश असतील तर आम्हीही सगळे नाखूश आहोत.", असे शरद पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT