आठवडा बाजारात गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी ताब्यात...  विजय पाटील
महाराष्ट्र

आठवडा बाजारात गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी ताब्यात...

सांगली शहर पोलिसांची कारवाई

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : आठवडा बाजारात गर्दीचा फायदा घेवून, मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला सांगली शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत मोबाईल चोरीचे एकुण १५ गुन्हे उघडकीस आले आहेत. सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये झालेल्या मोबाईल चोरी आणि आठवडा बाजारात गर्दीचा फायदा घेवून घडणा-या मोबाईल चोरी बाबत सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने २ संशयितास ताब्यात घेतले आहे.

हे देखील पहा-

त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी वयस्कर लोक आणि महिला यांचेवर पाळत ठेवून, गर्दीचा फायदा घेवून वरच्या खिशात ठेवलेले मोबाईल तसेच पर्समध्ये ठेवलेले मोबाईल हे पिशवी आडवी लावून हातचलाखिने चोरी केल्याची कबुली दिली आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, कर्नाटक आणि सांगली शहरात आठवडा बाजार, एसटी स्टॅण्ड परिसर याठिकाणी आणखी मोबाईल चोरी केल्याचे सांगितले आहे. या आरोपींकडून चोरी केलेले १५ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bedroom Decoration Ideas For Couple : रोमॅन्टिक कपलसाठी बेडरूम डेकोरशनच्या 5 भन्नाट आयडिया, आनंददायी वाटेल

Navratri 2026 : नवरात्रीत देवीसमोर 'या' दिशेला लावा अखंड दिवा; घरात येईल पैसाच पैसा

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीचा थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

IND vs SL ODI Fact Check: पहिला वनडे सामना दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार? व्हायरल सत्य

Maharashtra News Live Update: ८ आठवड्यांच्या आत सर्व समित्या गठीत करा, हायकोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT