Rain Alert in Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

IMD Rain Alert: शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; अवकाळीबाबत हवामान खात्याची मोठी अपडेट

Rain Alert in Maharashtra: भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांत राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा धोका आहे. तर काही ठिकाणी गारपीटीची देखील शक्यता आहे.

Satish Daud

Maharashtra Rain Alert

गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने तडाखा दिला. अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळीचं संकट कधी दूर होईल, याची वाट शेतकरी पाहत असताना दुसरीकडे आणखीच चिंता वाढवणारी बातमी आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यात अवकाळीचा इशारा दिला आहे.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांत राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा धोका आहे. तर काही ठिकाणी गारपीटीची देखील शक्यता आहे. शेतकऱ्यांनी खरीप तसेच रबी हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्रात कुठे कोसळणार पाऊस?

आयएमडीच्या अंदाजानुसार, आज म्हणजेच शुक्रवारी विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यातही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा सरी कोसळण्याची शक्यता आहे. उर्वरीत ठिकाणी दिवसभर ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे.

अवकाळीमुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. अशातच मराठवाडा आणि विदर्भाला पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे.

पुढील २४ तास मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपुरात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.

मध्य महाराष्ट्रातही दोन दिवस पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. पावसामुळे तापमानात घट होणार आहे. पुढील तीन दिवसात किमान तापमानात २-३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे . काही ठिकाणी धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Hapus Price: फळांचा राजा पुण्यात दाखल, हापूस आंब्याची १ पेटी ४१,००० रुपयांना

Jio Offers : जिओचा नवा रिचार्ज प्लॅन लॉन्च! तब्बल ३ वर्ष चालणार, अनलिमिटेड कॉलिंग, डेटा अन् भरपूर फायदे; किंमतही समोर

Investment Fraud: गवंडी काम करणाऱ्या व्यक्तीने रचला ६७० कोटींचा महाघोटाळा; ७४०० लोकांना लावला लाखांचा चुना, बिंग कसं फुटलं?

Maharashtra News Live Update: जालन्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी-भाकर खाऊन सरकारचा निषेध

Diwali Muhurat Trading: दिवाळीत मोठा धमाका! शेअर बाजारात जोरदार तेजी, मुहूर्त ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स- निप्टीमध्ये मोठी वाढ

SCROLL FOR NEXT